Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हत्तीचा जिवघेणा हल्ला, व्हायरल VIDEO पाहून थरकाप उडेल

Animal Viral Video: एका हत्तीच्या हल्ल्यात रशियन पर्यटकाला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राण्यांच्या हल्ल्यात आता पर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. कधी भटक्या कुत्र्याचा व्यक्तीवर हल्ला होतो तर कधी बिबट्याच्या हल्ल्यात अनेतजण मृत्यूमुखी झाले आहेत तर सोशल मीडियावर आपल्याला अशा प्रकारचे अनेक थरारक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका हत्तीच्या हल्ल्यात रशियन पर्यटकाला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थानमधील आमेर किल्ल्यावरील आहे.या किल्ल्यावर आलेल्या एका रशियन पर्यटकाला हत्तीने चक्क सोंडेने पकडून फेकून दिले आहे,ज्यात या पर्यटकाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. आमेर किल्ल्यावरची ही घटना १३ फेब्रुवारी रोजी घडल्याची समजते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राजस्थानमधील त्या किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे तसेच या किल्ल्यावर फिरता यावे यासाठी दोन हत्तीही आपल्याला दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस दिसते की काही पर्यटक हत्तीच्यावर बसलेले दिसत आहेत तेवढ्यातच एक हत्ती एका पर्यटकाला सोंडेत पकडतो आणि गोल फिरवून जमिनीवर फेकतो. त्याठिकाणी असलेले इतर पर्यटक भितीने पळापळ करतात.

व्हायरल होत असलेला राजस्थानमधील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@MansaRajasthani या एक्स(ट्वीटर)अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत व्हिडिओला नेटकऱ्यांचे लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स व्हिडिओला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT