Viral video claiming RSS demolished a temple — fact-check reveals the real truth behind the clip. saam tv
व्हायरल न्यूज

RSSने मंदिर तोडलं? मंदिर उद्ध्वस्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल, सत्य काय?

Fact Check RSS Demolishing Jharkhand Temple: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो.आणि सत्य सांगतो. आता असाच एक मंदिर पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. RSS ने हे मंदिर पाडलं असा दावा केलाय.पण, खरंच RSSनेच मंदिरावर बुलडोझर चालवलाय का? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • बुलडोझरने मंदिर पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय.

  • आरएसएसचे सदस्य मंदिर पाडत असल्याचा दावा करण्यात आलाय.

  • ढोंगी आणि आंधळे अनुयायी यावर गप्प का?

हा व्हिडिओ पाहा. या व्हिडिओत मंदिराचं पाडकाम सुरू असल्याचं दिसतंय. दावा करण्यात आलाय की हे मंदिर आरएसएस तोडतंय. मंदिर तोडतानाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. पण, खरंच मंदिर, हिंदूंसाठी नेहमीच आवाज उठवणाऱ्या आरएसएसने मंदिर तोडलंय का?

बुलडोझरने मंदिर पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय.आरएसएसचे सदस्य मंदिर पाडत आहेत.असा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय. अमित यादव या व्यक्तीने व्हिडिओ शेअर करून "बाबरचे आरएसएस सरकार मंदिरं पाडत आहे. असा दावा केलाय. तर भाजप जितकी मंदिरं पाडत आहेत तितकी कोणत्याही आक्रमकाने उद्ध्वस्त केलेली नाहीत.

हे ढोंगी आणि आंधळे अनुयायी यावर गप्प का? असा सवालही एकाने उपस्थित केलाय. पण, खरंच आरएसएसने मंदिर पाडलंय का? याची आम्ही पडताळणी केली.फोटोच्या रिव्हर्स फ्रेमही तपासून पाहिल्या. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

व्हायरल व्हिडिओ झारखंडमधील गिरिडीहमधील

पंच शिव मंदिर पाडतानाचा व्हिडिओ एक वर्ष जुना

नवीन मंदिराचे बांधण्यासाठी जुनं मंदिर पाडलं

आरएसएसने मंदिर पाडलं नसून, स्थानिकांनी पाडलं

पूजाविधी केल्यानंतर मंदिर पाडण्यात आलं

झारखंडच्या गिरिडीहमध्ये हे मंदिर 300 वृद्ध व्यक्तींनी पेन्शनच्या पैशांतून बांधलंय. मंदिरासाठी पैसे जमवण्यासाठी काहींनी दारू पिणंही सोडलं. आणि पैसे जमवून हे मंदिर बांधल्याची माहिती मिळतेय.जुनं मंदिर पाडून नवीन मंदिर बांधलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत आरएसएसने मंदिर पाडल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT