

मोहन भागवत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकारीवर भाष्य
तामिळनाडूतील लोकांना मातृभाषेत बोलण्याचा आग्रह भागवत यांनी केला.
त्यांनी दक्षिण भारतातील पारंपरिक संस्कृती आणि जीवनशैलीचे कौतुक केलं
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशाच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. भागवत यांनी चेन्नईतील आरएसएसच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी कोण असणार, यावर मोठं वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आपापसात चर्चा करून उत्तराधिकारीविषयी अंतिम निर्णय घेतील, असे भागवत यांनी सांगितले.
भागवत यांनी तामिळनाडूतील या सोहळ्यात त्यांच्या समितीवरही टिप्पणी केली. तामिळनाडूमधील लोकांमध्ये १०० टक्के राष्ट्रवादी विचारांची भावना आहे. परंतु बाह्य कृत्रिम शक्ती या लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात रोखत आहेत. या लोकांचे काम देश भावना संपुष्टात आणण्याच्या दिशेने सुरू आहे. तामिळनाडूची जनता संस्कृती, पंरपरा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित आहे. या मूल्यांना आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना भागवत यांनी बोलून दाखवली.
मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना भाषेची विविधता आणि संस्कृतीवरही विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या लोकांना मातृभाषेत बोलण्याचा आग्रह करत पारंपरिक जीवनशैली कायम ठेवण्याचाही सल्ला दिला.
'तुम्ही तामिळ भाषेत सही करताना का डगमगता, असंही त्यांनी लोकांना म्हटलं. भारतातील सर्व भाषांचं महत्व अधोरेखित करत भागवत यांनी म्हटलं की, भारतातील सर्व भाषा या आपल्या भाषा आहेत'. त्यांनी दक्षिण भारतातील राज्यांतील संस्कृतीचं कौतुक केलं. दक्षिण भारतातील राज्यातील लोक पारंपरिक पोशाख परिधान करतात, याचा अर्थ लोकांची नाळ आजही पारंपरिक संस्कृतीशी जुळलेली आहे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या उत्तराधिकारीबाबत RSS प्रमुख भागवत यांनी काय सांगितलं?
मोहन भागवत यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आपापसात चर्चा करतील. त्यानंतर ते त्यांच्या उत्तराधिकारीबाबत अंतिम निर्णय घेतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.