

यूनियन बँक ऑफ इंडियानं दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयकडून अनमोल अंबानी यांच्यावर गुन्हा
अनमोल यांच्यावर २२८ कोटींच्या कथित फसवणुकीचा आरोप आहे.
कर्ज घेतल्यानंतर निधीचा चुकीचा वापर झाल्याचा संशय
उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल सीबीआयच्या कचाट्यात अडकलाय. २२८ कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात जय अनमोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाला २२८.०६ कोटींना फसवल्याचा प्रकरणी सीबीआयकडून कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अनिल अंबानी यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून कारवाईचा फास आवळण्यात आलेला आहे. आता मुलगा जय अनमोल यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यूनियन बँक ऑफ इंडियाकडून याबाबत तक्रार करण्या आली होती. त्याआधारावर सीबीआयकडून कारवाई करण्यात येत असल्याचे वृत्त पीटीआयकडून देण्यात आलेय. अनमोल अंबानी यांनी त्यांच्या समूहातील एका कंपनीमार्फत बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर कर्ज फेडले नाही. त्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सीबीआय आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सीबीआयकडून निधीचा चुकीचा वापर केला, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
बँकेच्या तक्रारीनुसार, RHFLने मुंबईतील बँकेच्या SCF शाखेने व्यावसायिक कामांसाठी ४५० रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची सुविधा घेताना बँकेने काही अटी ठेवल्या होत्या. यात वेळेवर कर्जाचे हप्ते, व्याज आणि इतर शुल्क भरण्यास सांगितलं होतं. तसेच सर्व विक्री उत्पन्न बँक खात्यातून वर्ग करण्यात येणे अनिवार्य होते.
कंपनी वेळेवर हप्ते भरण्यास अयशस्वी ठरली. त्यामुळे त्यांचं खातं ३० सप्टेंबर २०१९ रोजी एनपीए (Non-Performing Asset) घोषित करण्यात आलं होतं. बँकेच्या तक्रारीवरून १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ रोजी फोरेन्सिक ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडिटमध्ये घेतलेल्या कर्जाचा वापर दुसऱ्याच कामासाठी केल्याचं उघड झालं. कर्जस्वरुपी घेण्यात आलेली रक्कम ही व्यावसायिक उद्देशाच्या ऐवजी इतर कामासाठी वापरली जात होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.