अहल्यानगरमध्ये खळबळ! भाजप खासदाराच्या निकटवर्तीयावर बंदूक रोखली, नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

Ahilyanagar crime news : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात भाजपचे नगरसेवक आणि सुजय विखे पाटील यांचे निकटवर्तीय दशरथ तुपे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Sujay Vikhe
Sujay Vikhesaam tv
Published On

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी

Ahilyanagar crime news : यात्रेतील टेंडर दुसऱ्याला दिल्याच्या कारणावरून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात घडला आहे. भाजपचे नगरसेवक तथा सुजय विखे यांचे निकटवर्तीय दहरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहाता शहराचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून तुपे यांच्या फिर्यादीवरून तुषार सदाफळ नामक व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राहाता नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि नगरसेवक तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केलीय.

Sujay Vikhe
LPG shortage : देशात गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, आणीबाणीच्या तरतुदी लागू

राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला दिले नाही याचा राग मनात धरून सदाफळ याने हे कृत्य केले आहे. शिवीगाळ करत स्वतःकडील परवानाधारक बंदुकीचा धाक दाखवून तुषार सदाफळ याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नगरसेवक दशरथ तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. तुषार सदाफळ हा परवानाधारक बंदुकीच्या जोरावर नेहमीच शहरातील व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करतो.

Sujay Vikhe
जसप्रीत बुमराहचं नाव नाही, विश्वचषकातील सर्वोत्तम ८ खेळाडूंची नावं जाहीर, वाचा ICC च्या यादीत कोण कोण?

यात्रेच्या टेंडर प्रक्रियेत माझा काहीही संबंध नसताना मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मला आणि माझ्या कुटुंबाला तुषार सदाफळ याच्यापासून धोका असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुपे यांनी केली आहे. दरम्यान घटनेनंतर तुषार सदाफळ हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विखे पाटलांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राहाता तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Sujay Vikhe
Gas Cylinders : दरवाढीचा भडका उडाला! घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ, वाचा ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com