BJP MLA Zimba Dance Video Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

BJP MLA Viral Video: मित्राला मिळालं लोकसभेचं तिकीट, भाजप आमदाराने केला जोरदार डान्स; Video व्हायरल

Zimba Dance Video Viral: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक भाजप नेता आपल्या मित्राला लोकसभेचं तिकीट मिळाल्याने नाचून आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

BJP MLA Viral Video:

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली जात असून, ही यादी पाहून अनेक नेते निराश झाले आहेत. तर काहींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक भाजप नेता आपल्या मित्राला लोकसभेचं तिकीट मिळाल्याने नाचून आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

भाजप आमदार नीरज झिंबा यांचा व्हिडिओ व्हायरल

भाजपचे दार्जिलिंगचे आमदार नीरज झिंबा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दार्जिलिंग लोकसभा जागेसाठी भाजपने त्यांच्या मित्राला तिकीट दिल्याने ते आनंद व्यक्त करत आहेत. भाजपने दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून राजू बिस्ता यांना उमेदवारी दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे आमदार नीरज झिंबा यांनी त्यांना उमेदवारी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते एका खोलीत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका खोलीतील आहे. यात टीव्हीवर तिकीट मिळाल्याची बातमी आल्यानंतर ते जोमात नाचताना दिसत आहेत.  (Latest Marathi News)

कोण आहेत नीरज झिंबा?

दरम्यान, भाजपचे आमदार नीरज झिंबा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले होते. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या 10 वर्ष जुन्या वचनाची आठवण करून दिली. ज्यामध्ये गोरखांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन पंतप्रधान मोदींनी आजपर्यंत पूर्ण केलेले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे (GNLF) सरचिटणीस म्हणून काम करणारे झिम्बा हे बिस्ता यांचे चांगले मित्र आहेत. बिस्ता यांना भाजपने तिकीट न दिल्यास दार्जिलिंगमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे झिम्बा यांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र आता बिस्ता यांना तिकीट मिळालेल्या त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport नामकरणावरून वाद न्यायालयात, केंद्र सरकारकडून निर्णयाला विलंब

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Satara Gazetteer: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय? पाहा सविस्तर | VIDEO

Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT