जयपूरमध्ये सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात धक्कादायक घटना घडलीय. नाचत असताना ४५ वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या शिक्षकाच्या त्याच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिक्षक आनंदाने नाचत होता. नाचताना ते अचानक जमिनीवर पडले आणि सुखावर विरजन पडलं. जयपूरमधील रेनवालच्या भैंसलाना गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिक्षक खाली पडलेले पाहुन लोकांनी लगेचच सुरू असलेला कार्यक्रम थांबवला. हृदयविकाराचा झटका बसल्याची कळताच लोकांनी त्यांना १० मिनिटं सीपीआर दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, भैंसलाना येथील जालबली बालाजी मंदिरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मन्नाराम जाखड, असं या मृत पावलेल्या शिक्षकाचं नाव आहे. मन्नाराम यांच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्तच्या भजनाचा कार्यक्रम होता.
यानिमित्ताने शिक्षक मन्नाराम जाखड हे देखील सकाळी त्यांच्या मूळ गावी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. 'एक दिन मर जाऊं ला कानूड़ा, ध्हारी मुस्कान के मारे...' हे भजन सुरू झालं. या भजनावर जाखड नाचू लागले. प्रत्येक भजनावर मन्नाराम जाखड नाचत होते.
'एक दिन मर जाऊं ला कानूड़ा, ध्हारी मुस्कान के मारे या भजनावर नाचताना ते अचानक खाली पडले. सुरुवातीला लोकांना नेमकं काय झालंय हेच कळलं नाही. पण नंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत मन्नाराम हे जोधपूर जिल्ह्यातील जुड गावातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेच्या काही मिनिटं आधी त्यांनी पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह डान्स केला. शिक्षकाच्या मृत्यूबाबत कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.