Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : अरे बापरे! रात्रीच्या अंधारात गावात शिरला भलामोठा अजगर; गावकरी प्रचंड घाबरले, पाहा थरारक VIDEO

Python in vasai village : गावाच्या पश्चिमेला असलेल्या गावदेवी मंदिराकडील रस्त्यावर ही घटना घडली. साधारण 10 फुट लांबीचा अजगर रात्री साडे दहाच्या सुमारास या रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना लाईटच्या उजेडात दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वसई पूर्वेतील ग्रामीण भाग असलेल्या खानिवडे गावात रात्रीच्या अंधारात रस्त्यावर भला मोठा अजगर आला होता. अजगर पाहून येथील गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या अजगराला आता जेरबंद करण्यात यश मिळालं आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गावाच्या पश्चिमेला असलेल्या गावदेवी मंदिराकडील रस्त्यावर ही घटना घडली. साधारण 10 फुट लांबीचा अजगर रात्री साडे दहाच्या सुमारास या रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना लाईटच्या उजेडात दिसला. अजगर दिसताच येथील ग्रामस्थांना घाम फुटला.

त्यामुळे वस्ती असलेल्या या भागातील गावकऱ्यांनी तोंडाने मोठे आवाज करून काठ्या दांडके रस्त्यावर आपटून त्याला पिटाळून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र तरीही अजगर काही जागचा हालला नाही. म्हणून त्यांनी जीव संरक्षक काम करणाऱ्या सर्प मित्रांना याची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर तात्काळ दोन सर्प मित्र तेथे दाखल झाले.

आलेल्या दोन सर्प मित्रांना अजगराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अजगराच्या अत्यंत ताकतीच्या वेटोळ्यात आपलं अंग सापडू नये याची दक्षता घेत त्यांनी त्याला कपडलं आहे. गावकऱ्यांना अजगर हा विषारी नसल्याचा विश्वास देऊन सर्प मित्रांनी त्यांची सुद्धा मदत घेतली.

तसेच अजगराला गोणपाटात जेरबंद करण्यात यश मिळवलं. दरम्यानच्या काळात अजगराची सुटण्याची धडपड सांभाळताना तसेच त्याच्या चाव्यातून आणि मगर मिठीतुन वाचताना सर्प मित्रांची दमछाक झाली होती. मात्र जसं अजगराला गोणपाटात बंद केलं गेलं, तसा गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

योगेश वाहूल आणि उमेश घरत या दोन जीव संरक्षक प्राणी मित्रांनी गावकऱ्यांच्या मदतीने अजगराला पकडले आहे. तसेच आता दूर रानात नेऊन सोडले. यावेळी याठिकाणी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच गावात आता काय होणार आणि काय नाही या भीतीने संपूर्ण गावकरी घाबरले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT