Python Viral Video: अजगराच्या अंड्याला हात लावताच हल्ला; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: त्यांना डीवचलं असता प्राणी देखील त्याचा बदला घेतात.
Python Viral Video
Python Viral VideoSaam TV
Published On

Python Eggs Viral Video: साप, अजगर अशा प्राण्यांचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अजगर हे नाव ऐकलं तरी आपल्या काळजात धडकी भरते. मात्र काही सर्पमीत्र त्यांच्याशी एका मित्रासरखेच राहतात. मात्र त्यांना डीवचलं असता प्राणी देखील त्याचा बदला घेतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest Marathi Video)

अजगराची अंडी चोरण्याचा प्रयत्न

व्हिडिओमध्ये (Video) तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती थेट अजगराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक आईसाठी आपलं बाळ फार प्रिय असतं. त्याच्या केसालाही आई धक्का लागून देत नाही. प्राण्यांचं देखील असंच काहीसं असतं. प्राणी किंवा पक्षी देखील आपल्या अंड्यांजवळ कोणालाही येऊ देत नाहीत. ते त्या व्यक्तीवर लगेच हल्ला करतात.

Python Viral Video
Mumbai Crime News: डिलिव्हरी बॉय ग्राहकांचं पार्सल परस्पर विकायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टेबलावर भलामोठा अजगर आहे. या अजगराने २० ते २५ अंडी दिली आहेत. आपली अंडी कोणीही घेऊन जाऊ नये अथवा त्यांना काही इजा होऊनये म्हणून अजगर या अंड्यांभोवती वेटोळे घालून बसला आहे. जवळ येणाऱ्या प्रत्येकावर अजगर हल्ला करत आहे.

अंडी चांगली रहावी आणि त्यातून अजगराच्या (Python) पिल्लांनी जन्म घ्यावा यासाठी पोषक वातावरण असणे गरजेचे असते. मात्र ही अंडी टेबलवर असतात. त्यामुळे तेथून काढून एका विशिष्ट ठिकाणी त्यांना ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे एक सर्पमित्र अजगर आणि अंडी (Egg) दुसऱ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो. अंडी बाहेर घेत असताना अजगराला ते पटकन लक्षात येतं आणि तो थेट त्या व्यक्तीवर हल्ला करतो. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Python Viral Video
Beach Dance Viral Video: समुद्रात भडकली चिंगारी; जोडप्याचा रोमँटिक डान्सने सोशल मीडियावर वातावरण तापलं

सदर व्हिडिओ @jayprehistoricpets या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. जय ब्रेवर हे एक सर्पमित्र आहेत. सापासोबतचे त्यांचे अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झालेत. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे की, "अजगर आणि त्याची अंडी सुरक्षित राहणे गरजेचे होते. मात्र हे काम करताना जीव जाण्याची शक्यता होती. मात्र तरीही मी ती जोखीम पत्करली. "

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com