narendra modi news  saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Viral video fact check : पंतप्रधान मोदी 5 हजारांचं गिफ्ट देणार आहेत...होय, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच मोदी गिफ्ट देणार आहेत का..? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

मोदी सरकार दिवाळीला मोठ्ठं गिफ्ट देणार आहेत...आणि प्रत्येकाच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, सर्वांनाच मोदी पैसे देत असल्याचा दावा केल्याने पैसे मिळवण्यासाठी काय करायचं...? पैसे कसे मिळणार असे प्रश्न अनेकांना पडलेयत...

मोदी सरकारने दिवाळी भेट म्हणून 5 हजार देण्याचा निर्णय घेतलाय असा दावा केलाय...पैसे मिळवण्यासाठी एक लिंकही देण्यात आलीय...या लिंकवरील सर्व माहिती भरून दिल्यावरच पैसे मिळणार असा दावा केलाय...मात्र, खरंच यासोबत दिलेला अर्ज भरल्यानंतर 5 हजार रुपये मिळणार का...? खरंच मोदींनी अशी घोषणा केलीय का...? असे प्रश्न पडल्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...

व्हिडिओमध्ये या योजनेचे नाव 'मोदी दिवाळी उपहार योजना' असे सांगितले जात आहे...त्यामुळे आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...खरंच ही योजना असेल तर त्याचा लाभ गरजूंना मिळायला हवा...म्हणून आम्ही याची माहिती मिळवली असता, आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

मोदींनी 5 हजार रुपये देण्याची घोषणा केलेली नाही

व्हायरल व्हिडिओतील दावा खोटा

मोदींचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला

2022 सालातील व्हिडिओची छेडछाड करण्यात आली

केंद्र सरकारची अशी कोणतीही दिवाळी गिफ्टची योजना नाही...दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...त्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ पाहून लिंकच्या आधारे कोणतेही अर्ज भरू नका...तुम्हाला पैसे मिळण्याऐवजी फसवणूक होऊ शकते...आमच्या पडताळणीत मोदी 5 हजारांचं गिफ्ट देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

Rohit Shetty: रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटींच्या खंडणीची मागणी अन्..., नेमकं काय घडलं?

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

SCROLL FOR NEXT