Surabhi Jayashree Jagdish
केसांना तेल लावणं ही अनेक भारतीय घरांमध्ये लहानपणापासूनची सवय आहे. आई-वडील किंवा आजी आजोबा गरम तेलाने केसांची मसाज करून काळजी घेतात. ही केवळ परंपरा नसून केसांसाठी नैसर्गिक पोषणही आहे. पण जर महिनाभर तेल लावणं अचानक थांबवलं, तर केसांमध्ये काही बदल दिसू लागतात.
पहिल्या काही दिवसांत तेल न लावल्याने विशेष बदल जाणवत नाही. केस थोडे हलके आणि कमी चिकट वाटू शकतात. त्यामुळे अनेकांना हे आरामदायक वाटतं.
काही आठवड्यांनंतर केसांची टोकं कोरडे पडू लागतात. फ्रिझ वाढतो आणि केस हाताळणं कठीण होतं. केसांचा नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो.
तेल नसल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक हळूहळू कमी होते. केस मऊ ऐवजी रफ आणि निर्जीव वाटू लागतात. हे बदल विशेषतः कोरड्या हवामानात जास्त दिसतात.
तेल टाळूला एक संरक्षक थर देतं, जो कमी झाल्यावर टाळू कोरडा वाटू शकतो. काही लोकांना हलका ताण किंवा खाज जाणवू शकते. केस विंचरताना रफनेस अधिक जाणवतो.
तेल केसांना धूळ, प्रदूषण आणि उष्णतेपासून काही प्रमाणात संरक्षण देतं. ते नसल्यामुळे केस जास्त लवकर खराब होऊ शकतात. केस धुताना आणि स्टाईल करताना जास्त नुकसान होण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते तेल पूर्णपणे बंद करणं योग्य नाही. खूप वारंवार न लावता आठवड्यातून एकदा हलकं तेल लावणं चांगलं मानलं जातं.