यांना मिरच्या का झोंबतात? नळबाजार, भिवंडीत जाऊन विचारा!; राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा काढताच नितेश राणेंचं टीकास्त्र

Nitesh Rane News : बोगस मतदारांच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंच्या भाष्यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane News : Saam tv
Published On
Summary

राज ठाकरेंनी बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित करून निवडणुका थांबवण्याची भूमिका घेतलीये

नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर उलट निशाणा साधतलाय

राणेंनी व्होट जिहाद, अबू आझमी यांच्यावरही टीका केली

या आरोपांमुळे महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात विरोधकांनी मतदारयादीत बोगस मतदार घुसल्याचा आरोप केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार असून सुधारणा केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका जाहीर केली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून मंत्री नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, 'मला आश्चर्य वाटत आहे. राज ठाकरेंचे प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर का समोर आले नाहीत. लोकसभेनंतर काही मतदारसंघात १ लाखांहून मतदान होते. मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये १ लाखांहून मतदान होतं. काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतात, तेव्हा या लोकांना काहीच त्रास होत नाही. निवडणूक आयोगाचं कौतुक करतात.

Nitesh Rane
Bihar Election : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडली; आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

'विधानसभा निवडणुकीनंतर पाकिस्तान जिंदाबाद, हिरवे झेंड्याला प्रत्युत्तर विधानसभेत भगव्या झेंड्याने दिलं. तेव्हा या लोकांना मिरच्या का लागतात? व्होट जिहादवर काही बोलायचं नाही. हिंदू समाज एकगठ्ठा मतदान करतो, तेव्हा यांना मिरच्या लागतात.तुम्हाला चौकशी करायची असेल, तर नळबाजार,मालेगाव, बेहरामपाडा येथे जाईल. तिथे जाऊन विचारा.एकाएका घरात रोंहिंगो, बांगलादेशी मुस्लिम कसे राहतात, मोहल्ल्यात राहणारा मूळचा त्याच भागातील मतदार आहे का? असा सवाल मंत्री राणे यांनी केला .

Nitesh Rane
Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

'हिंदूच्या घरात जाऊन मतदार यादी तपासायची आहे. अबू आझमी भिवंडीत मराठी बोलायची गरज नसल्याचं म्हटलं. त्यांना कानाखाली का लगावली नाही? मिरा-भाईंदरमध्ये हिंदू भावाने मराठीत न बोलल्याने त्याच्या कानाखाली लगावली. मग अबू आझमींना का लगावली नाही? तो तुमचा जावई आहे का? भिवंडीच्या पडघममध्ये ९९ टक्के मुस्लीम राहतात, असाही आरोप नितेश राणे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com