Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

Shreya Maskar

कर्जत

रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून पूर्वेकडे सुमारे २५ किमी अंतरावर पदरगड किल्ला वसलेला आहे, ज्याला 'कलावंतीचा महाल' असेही म्हटले जाते.

Karjat | google

पदरगड किल्ला

भीमाशंकर ट्रेकच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्याची उंची २,२०२ फूट आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या आत वसलेला हा किल्ला रोमांचक आणि उभ्या खडकावरील 'चिमणी क्लाइंब'साठी ओळखला जातो.

Padargad Fort | google

किल्ल्याची रचना

किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून यात दोन उंच खडकाळ सुळके एका अरुंद पठाराने जोडलेले आहेत. हा किल्ला 'चिमणी' शैलीतील खडतर रॉक-क्लांबिंग मार्गांसाठी ओळखला जातो.

Fort structure | google

किल्ला कोणी बांधला?

१७ व्या शतकात मुघलांनी (विशेषतः सम्राट औरंगजेबाच्या काळात) धोरणात्मक टेहळणीची चौकी म्हणून किल्ल्याची उभारणी केली होती.

Who built the fort? | google

कसं जाल?

मुंबईहून पदरगडला जाण्यासाठी ट्रेनने कर्जत स्टेशनला पोहचा तेथून बस किंवा रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात म्हणजेच 'खांडस' येथे जा. पुढे छोटा ट्रेक करा.

how do you go | google

उद्देश

पदरगड किल्ला मुघल-मराठा संघर्षादरम्यान प्रामुख्याने धोरणात्मक टेहळणीची चौकी म्हणून कार्यरत होता. किल्ल्याची मुख्य भूमिका शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि 'गणपती घाट' या महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करणे ही होती.

Purpose | google

कर्जतमधील ऐतिहासिक ठिकाणे

कोंढाणे लेणी, पेठ किल्ला , सोंडाई किल्ला, बहिरी गुहा, कोंडेश्वर मंदिर कर्जत येथे ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

Historical Places in Karjat | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Lohagad Tourism | saam tv
येथे क्लिक करा...