Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

लोहगड किल्ला

ऐतिहासिक लोहगड किल्ला पुण्यात आहे. तुम्ही लोहगडला गेल्यावर जवळच असलेल्या ५ सुंदर मॉन्सून स्पॉट्सना भेट द्या.

Lohagad Fort | google

पवना तलाव

लोहगड किल्ल्यापासून सुमारे १२-१५ किमी अंतरावर पवना तलाव आहे. हिरव्यागार टेकड्यांनी पवना तलाव वेढलेला आहे. तुम्ही येथे कॅम्पिंगचा प्लान करू शकता.

Pawna Lake | google

विसापूर किल्ला

लोहगडच्या अगदी जवळ विसापूर किल्ला आहे. पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. येथे तुम्ही पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहू शकता.

Visapur Fort | google

भुशी धरण

लोहगडपासून साधारण २० किमी अंतरावर भुशी धरण आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. पावसाळ्यात येथे परदेशी पर्यटकही येतात.

Bhushi Dam | google

भाजा- कार्ला लेणी

मळवलीजवळ थोड्या अंतरावर भाजा- कार्ला लेणी आहेत. येते वास्तुकला आणि शिल्पकलेचा अनोखा नजारा पाहायला मिळतो. पावसाळ्यात येथे हिरव्या दऱ्या आणि धबधबेही दिसतात.

Bhaja and Karla Caves | google

टायगर्स लीप

लोहगडजवळ खंडाळा हिल स्टेशन आहे. तेथे टायगर्स लीप हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे दाट धुके पसरते. तसेच या व्ह्यू-पॉइंटवरून स्वर्गाहून सुंदर निसर्गाचा नजारा दिसतो.

Tiger's Leap | google

राजमाची किल्ला

लोणावळा-खंडाळा मार्गावर थोड्या अंतरावर राजमाची किल्ला आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे. दाट हिरवीगार वनराई आणि पांढरे शुभ्र धबधब्यांनी येथील परिसर बहरतो.

Rajmachi Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील अभेद्य लोखंडी दुर्ग! मुंबईहून लोहगड किल्ल्याला कसं जाल?

Lohagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...