Manu- Neeraj viral message 
व्हायरल न्यूज

Manu- Neeraj: मनू आणि नीरज लवकरच लग्नबंधनात अडकणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Manu- Neeraj: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत नवा इतिहास रचिलाय. आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात रंगू लागलीय. मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल करत हा दावा केला जातोय. साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय. पाहूयात हा रिपोर्ट

Mayuresh Kadav

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज मनू भाकर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत तमाम भारतीयांची मनं जिंकली. या दोघांनी ऑलिम्पिकचं मैदान तर मारलं मात्र आता ही जोडगोळी आयुष्याची नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सोशल मीडियात काही व्हिडीओ व्हायरल करत मनू आणि नीरजच्या लग्नाचा दावा केला जातो..

हा व्हिडीओ पाहा, यात मनू भाकर आणि नीरज चोप्रा एकमेकांशी बोलताना दिसतायेत. या व्हिडीओवरूनच चर्चांचा बाजार गरम झालाय. आता हा दुसरा व्हिडीओ पाहा..यातमनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा दिसतोय. या व्हिडीओत सुमेधा भाकर नीरजचा हात पकडून आपल्या डोक्यावर ठेवतात. या दोन्ही व्हिडीओवरूनच सोशल मीडियात दोघांच्या लग्नाचा दावा केला जातोय.

मनू भाकर आणि नीरज चोप्रा हे युवापिढीचे आयकॉन आहेत. ऑलिम्पिक मेडल जिंकून देत दोघांनीही देशाचा नावलौकिक वाढवलाय. त्यामुळे व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे? मनू आणि नीरज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत का? साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

मनू भाकर आणि नीरज चोप्रा दोघांच्याही कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना लग्नाचा दावा फेटाळून लावलाय. नीरजचे काका सुरेंद्र चोप्रा यांनी नीरजचा साखरपुडा झाल्याचं सांगितलंय. तर मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनीही व्हायरल व्हिडीओवरून नाराजी व्यक्त केलीय. एक आई आपल्या मुलासोबत बोलू शकत नाही का? असा सवाल करत दोघांच्या लग्नाची अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं. मनूच्या लग्नाचं वय नसून करिअरवरच तिचा फोकस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत नेमबाज मनू भाकर आणि नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र त्यांचे व्हिडीओ व्हायरल करून लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्ही अशा व्हिडीओवर आणि मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT