Palghar Bus Accident Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: भरधाव डंपरची बसला धडक, २ ठार, थरकाप उडवणारे ६ सेकंद... VIDEO

Accident Video: पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या भयंकर अपघाताचे थरकाप उडवणारे सीसीटिव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

रुपेश पाटील, पालघर|ता. ३१ डिसेंबर २०२३

Palghar Bus Accident Video:

पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. शनिवारी (३० डिसेंबर) ही भीष अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या भयंकर अपघाताचे थरकाप उडवणारे सीसीटिव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 पालघरच्या (Palghar) मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

भरधाव डंपर आणि बसची समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे. अवघ्या सहा सेकंदाचा हा व्हिडिओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, भरधाव डंपर आणि बस छोट्याशा रस्त्यावरुन सुसाट वेगात एकमेकांसमोर येतात. काही समजायच्या आत दोन्ही वाहनांची जोरदार धडक होते. ही धडक इतकी भीषण असते की बसची एक बाजू पुर्णपणे उध्वस्त होते. या अपघातात २ जण ठार झाले असून २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT