One Family One Job Viral Post Fact Check Saam Tv
व्हायरल न्यूज

One Family One Job: एक कुटुंब एक नोकरी योजना, निरक्षरांना 25 हजार पगार; काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य? वाचा..

Fact Check: सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, केंद्र सरकार एक कुटुंब एक नोकरी योजनेअंतर्गत प्रत्येकाला नोकरी देणार. काय आहे यामागील सत्य, जाणून घेऊ...

Satish Kengar

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारची माहिती व्हायरल होत असते. यापैकी काही खऱ्या ठरतात, तर अनेक गोष्टी खोट्या असल्याचे समोर आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या एका युट्युब चॅनेलची थंबनेल असलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे ली की, केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार आहे. यामध्ये निरक्षर ते पदवीपर्यंतच्या लोकांसाठी वेगवेगळं वेतन नमूद करण्यात आलं आहे.

व्हायरल पोस्टमध्ये काय सांगण्यात आलं आहे?

युट्युबवरील राजा टेक्नॉलॉजी टिप्स नावाच्या चॅनेलवरील व्हिडिओची ही थंबनेल आहे. या चॅनलचे जवळपास ४० हजार फॉलोअर्स आहेत. एक कुटुंब एक नोकरी योजना, सर्वांना नोकरी मिळेल, असे पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

निरक्षरांना २५ हजार रुपये, पाचवी उत्तीर्णांना ३० हजार रुपये, आठवी उत्तीर्णांना ३५ हजार रुपये, दहावी उत्तीर्णांना ४० हजार रुपये आणि पदवी उत्तीर्णांना ८० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, असंही यात सांगण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही दिसत आहे. जेणेकरून केंद्र सरकारने ही योजना आणल्यासारखे वाटेल.

यातच आता केंद्र सरकाराच्या पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्यामागील सत्य सांगितलं आहे. ज्यात पीआयबी फॅक्ट चेकने एक X वर एक पोस्ट करत लिहिलं आहे की, , "Raza Technology Tips नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ थंबनेलमध्ये केंद्र सरकार एक कुटुंब एक नोकरी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देईल, असा दावा केला जात आहे. हा दावा खोटा आहे.''

म्हणजेच केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही, ज्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल. यामुळे Raza Technology Tips चॅनलने केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT