Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आप्पाचा विषय लय हार्ड! सीट पकडण्यासाठी थेट एसटी बसच्या खिडकीवर, आजीही लाजल्या, पाहा व्हिडीओ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एसटीचा प्रवास आपल्यापैंकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केला असले. एसटीला महाराष्ट्राची लालपरी असेही म्हणतात. शहरातील नागरिकच नाही तर गावाकडील अनेक नागरिक एसटीचा मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. एसटी प्रवास करत असताना आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. कधी बस स्टॉपवर प्रवाशांमध्ये होणारे वादविवाद तर कधी भर बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत बस चालकांमध्येच होणारी हाणामारी.सध्या एसटीचा विशेष उल्लेख का केला हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? कारण सध्या सोशल मीडियावर एका एसटी डेपोवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांच्या गर्दीला वैतागलेल्या वयोरुद्ध काकांनी एसटीच्या खिडकीतून आत चढण्याचा मार्ग काढला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला बस (Bus) एका ठिकाणी थांबलेली दिसत आहे. बसच्या बाहेर अनेक प्रवाशांची गर्दी आहे शिवाय बसचा एक कर्मचारीही तिथे उभे असलेले व्हायरल व्हिडिओत दिसत आहेत. मात्र एक वयोरुद्ध (Vayoruddha) आजोबा बसच्या खिडकीत उभे असलेले दिसून येत आहेत. व्हिडिओ जस जसा तुम्ही पाहाल तर दिसेल की, खिडकीच्या येथे उभे असलेले आजोबा थेट खिडकीतून बसच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या आजोबांना बसच्या बाहेर असलेले अनेक व्यक्ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते आजोबा कोणाचही ऐकण्याचे नाव घेत नाही. आजोबाच्या अशा वागण्याला पाहून बसच्या बाहेर असलेले व्यक्ती आश्चर्यात (surprise) पडत आहेत.

सध्या व्हायरल (Viral) व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील marathi_epic_jokes या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या घरात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज (Views) मिळत आहेत.

व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'' कुठला आहे हे आजोबा धरा यांना'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''आजोबा (Old Man) काय करतील काही सांगता येत नाही'',तर अनेक यूजर्यंनी हसण्याचे इमोजी कमेंटबॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील कुठल्या शहरातील किंवा गावाकडील आहे हे समजले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT