Tandoori Roti Video: सावधान, तुम्ही खाताय थुंकलेली तंदूर रोटी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Tandoori Roti Video: आता बातमी आहे व्हायरल व्हिडिओची. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत जेवणावर ताव मारत असाल तर ही बातमी पाहा.
Tandoori Roti Video: सावधान, तुम्ही खाताय थुंकलेली तंदूर रोटी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
Tandoori Roti Video
Published On

थुंकून तंदूर रोटी बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही हॉटेलचं जेवण खाणं सोडाल. हे आरोग्यास धोकादायक असल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर रोटी खात असाल तर हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तंदूर रोटीच काय हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचीही इच्छा होणार नाही. रोटी बनवताना हा कूक आधी रोटीवर थुंकतो आणि मग रोटी भाजतो. 43 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.

Tandoori Roti Video: सावधान, तुम्ही खाताय थुंकलेली तंदूर रोटी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
Tandoor Roti: तुम्हीही तंदूर रोटी खाताय ? रेस्टॉरंटमध्ये बनवलेली तंदूरी रोटी ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक!

या व्हिडिओत एकूण 4 व्यक्ती दिसतोय. एक जण तंदूर रोटी बनवतोय तर तिघे त्याला मदत करतायत. यावेळी ही व्यक्ती तंदूर बनवताना आधी पीठ हातात घेतो. नंतर रोटी बनवते आणि त्यावर थुंकून मग ही रोटी शेकतो. हाच व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ कुठला आहे. आपल्या महाराष्ट्रातील आहे का ? रोटीवर थुंकून हा रोटी का बनवतोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. थुंकून रोटी बनवणे हा अघोरी प्रकार आहे. यामुळे लोकांचं आरोग्यही धोक्यात असल्याने या व्हिडिओची आम्ही पडताळणी सुरू केली. अनेक लोक हॉटेलचं जेवण चवीचवीनं खात असतात. त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे याची पडताळणी आमच्या टीमने सुरू केली. अनेक वेबसाईट्स पाहिल्या. व्हिडिओ गुगल रिव्हर्स करून पाहिला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

साम इन्व्हिस्टिगेशन, व्हायरल सत्य

थुंकून तंदूर रोटी बनवणारा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही

व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडातील

हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला

व्हिडिओ दाखवून तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक झाली.

लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कूकला पोलिसांनी अटक केलीय...मात्र, यामागचं कारण कळू शकलेलं नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. त्यामुळे तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर हॉटेल व्यवस्थित आहे ना. ? तिथले कुक स्वच्छ ठिकाणीच जेवण बनवतायत ना.? याची खात्री करा? आमच्या पडताळणीत ही व्यक्ती थुंकून रोटी बनवत असल्याचा दावा सत्य ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com