Tandoor Roti: तुम्हीही तंदूर रोटी खाताय ? रेस्टॉरंटमध्ये बनवलेली तंदूरी रोटी ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक!

Side Effects Of Tandoori Roti: जेवणाची थाळी ही भाकरी, चपाती आणि रोटीशिवाय अपूर्णच असते. तंदूर रोटी हा रोटींचा एक प्रकार आहे. तंदूर रोटी ही वेज आणि नॉनव्हेज दोन्हींसोबत उत्तमप्रकारे खाल्ली जाते. मात्र मैद्यापासून बनवलेली ही रोटी तुमच्या आरोग्यासाठी किती चांगली आहे? हे जाणून घ्या.
Health Tips
Tandoor RotiSaam Tv

Side Effects Of Tandoori Roti: एखादा आनंदी दिवस, वाढदिवस असला की, आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. यावेळी रेस्टॉरंटमध्ये आपण विविध पदार्थाची चव चाखतो. रेस्टॉरंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली तंदूर रोटी सर्वजण आवडीने खातात.

जेवणाची थाळी ही भाकरी, चपाती आणि रोटीशिवाय अपूर्णच असते. तंदूर रोटी हा रोटींचा एक प्रकार आहे. तंदूर रोटी ही वेज आणि नॉनव्हेज दोन्हींसोबत उत्तमप्रकारे खाल्ली जाते. तंदूर रोटी ही भाजून बनवली जाते. यामुळे रोटीला येणारा सुंगध हा जास्तीच आवडतो. मात्र मैद्यापासून बनवलेली ही रोटी तुमच्या आरोग्यासाठी किती चांगली आहे? हे जाणून घ्या.

बहुतेक लोक रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर तंदुरी रोटी ऑर्डर करतात. अनेक लोक खास तंदूरी रोटी खाण्यासाठी हॉटेलमध्ये जेवायला जातात. तंदूरी रोटी ही डाळ, कढई पनीर, अंडा करी आणि चिकन इत्यादी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांसोबत आवडीने खाल्ली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या तंदूरी रोटीमुळे आरोग्याला किती नुकसान होते?

तंदुरी रोटीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त असतात. अर्थात एका तंदुरी रोटीमध्ये अंदाजे 120 कॅलरीज असतात. रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या तंदुरी रोटीमध्ये लोणी आणि अस्वास्थ्यकर चरबी भरलेली असते. जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

Health Tips
Thyroid Diet : थायरॉईडमुळे अचानक वजन वाढतेय? आहारात करा या पदार्थांचा समावेश, राहिल नियंत्रणात

हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तंदूरी रोटी का खाऊ नये?

1) मधुमेहाचा धोका

तंदूरी रोटी ही मैदापासून बनवली जाते तसेच यामध्ये अनेक अस्वास्थ्यकर गोष्टी वापरल्या जातात. जे शरीरासाठी योग्य नाही. तंदूरी रोटी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते .ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते.

2) हृदयविकाराचा धोका

रेस्टॉरंटमध्ये, लाकूड, कोळसा किंवा कोळशावर केलेल्या तंदूरमध्ये तंदूरी रोटी बनवल्या जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते ज्यामुळे हृदयासंबंधीत विकार होण्याचे शक्यता असते.

Health Tips
Kids Memory Power : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांची बुद्धी तल्लख करायचीये? जीवनशैलीत करा हे बदल

3) वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका

रिफाइंड पीठ खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. तंदूरी रोटीमध्ये वापरण्यात येणारे पीठ शरीरातील चरबी जाळण्यास प्रोत्साहन देते आणि चरबीचे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते.

4) तणाव आणि नैराश्य

तंदूरी रोटीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तणाव, नैराश्य आणि अनेक मानसिक आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होतो. हे पीठ छातीची जळजळ वाढवते. यामुळेच तंदुरी रोटीचे जास्त सेवन टाळावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com