Thyroid Diet : थायरॉईडमुळे अचानक वजन वाढतेय? आहारात करा या पदार्थांचा समावेश, राहिल नियंत्रणात

Suffering From Increased Weight : वाढते वजन ही एक समान्य समस्या आहे. बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. याची अनेक कारणे आहेत. परंतु, सतत वाढणारे वजन हे थायरॉईडचे कारण देखील असू शकते.
Thyroid Disorder, Thyroid Diet
Thyroid Disorder, Thyroid DietSaam Tv
Published On

Thyroid Disorder :

वाढते वजन ही एक समान्य समस्या आहे. बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. याची अनेक कारणे आहेत. परंतु, सतत वाढणारे वजन हे थायरॉईडचे कारण देखील असू शकते. बदलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे थायरॉईड हा आजर महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.

थायरॉईड ही आपल्या मानेच्या खालच्या भागात असलेली एक ग्रंथी आहे जी शरीरातील थायरॉईड नावाच्या संप्रेरकाला नियंत्रित करते. याच्या वाढीमुळे किंवा कमी झाल्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे हार्मोनल बदल, वजन वाढणे, भूक न लागणे, जास्त झोप लागणे अशी लक्षणे (Symptoms) दिसतात. जर तुमचे ही वजन वाढत असेल तर आहारात (Diet) या पदार्थांचा समावेश करा.

1. सी फूड

सी फूडमध्ये आयोडीनचा चांगला स्त्रोत आहे. रोजच्या आहारात सूप आणि सॅलडच्या रुपात याचा समावेश करा. याचे सेवन केल्याने थायरॉईड ग्रंथी चांगले कार्य करते.

Thyroid Disorder, Thyroid Diet
World Parkinson's Disease Day : पार्किन्सन आजार कसा होतो? याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

2. मासे

कॉड, ट्यूना आणि सॅल्मनसारख्या फिशमध्ये आयोडीन असते. या माशांचे सेवन केल्याने ओमेगा-३ फॅटी अॅसिडसह आयोडीनचा पुरवठा होतो.

3. दुग्ध उत्पादने

दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये आयोडीन जास्त आढळते. याशिवाय मीठ हा आयोडीनचा चांगला स्त्रोत आहे.

Thyroid Disorder, Thyroid Diet
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावल्याने काय होते?

4. अंडी

अंड्यांमध्ये (Eggs) आयोडीनसह अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये सेलेनियम आणि झिंक देखील अंड्यांमध्ये आढळते. जे थायरॉईडला चांगले कार्य करण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com