Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या स्टॉपवरून निघणार 'कॅप्टन्सीची बस', सर्वांचच तिकीट बुक; कोण होणार कॅप्टन?

Bigg Boss Marathi New Season Day 40 : आज बिग बॉसच्या मराठीच्या स्टॉपवरून कंटेन्डरची बस सुटणार आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.
Entertainment News
Bigg Boss Marathi 5Saam Tv
Published On

बिग बॉस मराठीचा 6 आठवडा सुरू आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात रोज नवीन टास्क पार पडत असतात. बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये कल्ला, राडा, गोंधळ, प्रेम, मैत्री पाहायला मिळते. आज बिग बॉसच्या मराठीच्या स्टॉपवरून कंटेन्डरची बस सुटणार आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आज बिग बॉस मराठीच्या स्टॉपवरुन कॅप्टनसी कंटेन्डरची बस सुटलेली दिसून येत आहे. दरम्यान घरातील सदस्य बसमध्ये बसण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अंकिता पॅडी दादाला विचारतेय,"गणपतीत कोकणात जाण्यासाठी तिकीट कनफॉर्म करू का?". यावर उत्तर देत पॅडी दादा त्यांचं बुकिंग झाल्याचं सांगतात.

दुसरीकडे अरबाज म्हणतोय,"घन:श्यामपेक्षा मी कॅप्टनसी चांगली करू शकतो". त्यावर अभिजीत म्हणतो,"घन:श्याम कॅप्टन का होऊ शकत नाही?". यावर पॅडी म्हणतो गुच्छा मारेल मी... दरम्यान घनश्याम म्हणतो आधीच जवळच्यांनी गुच्छा मारलेला कमी आहे का? असा टोला मारतो.

कॅप्टनसी कंटेन्डरची बस कधी सुटणार? या बसमध्ये प्रवासी काय धुमाकूळ घालणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार हेदेखील आजच्या एपिसोडमध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Entertainment News
Suraj Chavan Life story: गावाने वेड्यात काढलं, गणपतीसाठी राब राब राबला; सूरज आता गुलिगत चमकतोय, पण संघर्ष डोळ्यात पाणी आणेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com