Mother And Daughter Beaten Youth:  Saamtv
व्हायरल न्यूज

Nashik News: मायलेकींचा रुद्रावतार! छेड काढणाऱ्या टोळक्याला दिला लाथांचा 'प्रसाद', भरचौकात धु धु धुतलं; पाहा VIDEO

Mother And Daughter Beaten Youth: नाशिकमध्ये छेड काढणाऱ्या टोळक्याला मायलेकींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली असून ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

नाशिक, ता. ३० ऑगस्ट २०२४

Nashik News Updates: एकीकडे बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. शाळा, महाविद्यालयीन मुलींची छेड काढल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकमध्ये छेड काढणाऱ्या टोळक्याला मायलेकींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली असून ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये छेड काढणाऱ्या चार तरुणांना मायलेकींनी बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या पवननगर भागातील डॉ. हेडगेवार चौकातील ही घटना असून मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करत चौघांनाही ताब्यात घेतले आहे.

संंबंधित महिला आपली मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत डॉ. हेडगेवार चौकातील महापालिका रुग्णालयात येत होती. यावेळी चार टवाळखोर तरुणांनी त्यांची छेड काढली. सुरुवातीला तरुणांकडे महिलांनी दुर्लक्ष केले, मात्र तरुणांनी पुन्हा त्रास दिल्याने महिलेचा संताप अनावर झाला. ज्यानंतर त्यांनी टवाळखोरांच्या मागे जाऊन बेदम चोप दिला. महिलेसोबतच मागून आलेल्या महिलेची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीनं देखील टवाळखोरांना प्रसाद दिला.

भरचौकात या मायलेकींनी टवाळखोर तरुणांना बेदम चोप दिला, मुलीने एका तरुणाच्या डोक्यात खुर्चीही घातली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या माय-लेकींचा रुद्रावतार पाहून टवाळखोर तरुणांनी तिथून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून चारही महिलांना जेरबंद केले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असून मायलेकींनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रोच्या वेळेत बदल; रविवारी संध्याकाळी ६ नंतर सेवा बंद

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सासूसह तिघांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन

Makeup Hacks : दिवाळी असो वा भाऊबीज: आय मेकअप अन् लिपस्टिकच्या या ५ ट्रिक्सने मिळवा गॉर्जियस फेस्टिव्ह लुक

Government Holiday : दिवाळी सणानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर; कधी आणि कुठल्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

Ice on Face Benefits: पार्लरला जाण्याची गरज नाही! चेहऱ्यावर बर्फ लावल्याने मिळेल ग्लोइंग स्किन

SCROLL FOR NEXT