Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : सरकारी रूग्णालयात उंदरांचा सुळसुळाट, रूग्णाच्या अंगावर उंदीर फिरतानाचा व्हिडीओ समोर

नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने रुग्णालयाची दयनीय अवस्था आणि प्रशासनाची बेपर्वाई समोर आली आहे.

Manasvi Choudhary

उंदीर म्हटलं की किळसवाणं वाटतं. अनेकांच्या घरात, हॉटेलमध्ये उंदराचा सुळसुळाट पाहायला मिळतो. घरात उंदीर असल्यास ते रात्री मोकाटपणे फिरताना दिसतात. सोशल मीडियावर देखील उंदरांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? तुम्ही झोपले असताना उंदीर तुमच्या अंगा-खाद्यांवर खेळत आहे. नक्कीच नाही, असा कोणी विचार देखील करू शकत नाही. मात्र नांदेडच्या एका रूग्णालयात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील संताप येईल.

नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात एक महिला उपचार घेत असताना चक्क एक उंदीर समोरच खेळत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रूग्ण रूग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. दरम्यान तिच्या अंगावर उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहे. अनेक रूग्ण देखील तेथे दिसत आहेत. ज्या रूग्णालयात रूग्ण बरे होण्यासाठी जातात तेथेच असा प्रकार होत आहे.

वरील प्रकारावरून या रूग्णालयात उंदराचं साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. ही घटना गंभीर असून याकडे रूग्णालय प्रशासनाचं लक्ष नसल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदीराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता.आता या घटनांमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील दयनीय अवस्था आणि रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील कोणकोणती राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT