Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Viral Video : श्रावण महिन्यात पंचमुखी शिव मंदिरामध्ये जत्रेचे आयोजन करण्यात आले. या जत्रेत 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना एका तरुणाचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral Videox
Published On
Summary
  • श्रावण महिन्याच्या निमित्ताने शिव मंदिरामध्ये जत्रेचे आयोजन करण्यात आले.

  • या जत्रेमध्ये 'मौत का कुआ' या साहसी खेळात अपघात झाला.

  • 'मौत का कुआ'च्या भिंतीवर दुचाकीवर स्टंटबाजी करताना एक तरुण १५ फूट खाली पडला.

  • त्यानंतरही दुचाकी तासभर भिंतीवर गोल-गोल फिरत होती. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जत्रेतील 'मौत का कुआ' हा खेळ पाहायला मिळत आहे. या मौत का कुआमध्ये एकजण खाली पडल्याचे पाहायला मिळते, तर मौत का कुआच्या सेटअपच्या सभोवतालच्या भिंतीवर दुचाकी वेगाने धावत असल्याचे दिसते. हा खाली जमिनीवर पडलेला व्यक्ती हा दुचाकीस्वार असल्याचे म्हटले जात आहे. दुचाकीवर स्टंट करणारा हा तरुण १५ फूटावरुन खाली पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उत्तरप्रदेशातील महाराजगंज कोतवालीच्या थुथीबारी पोलीस स्टेशन परिसरातील प्रसिद्ध पंचमुखी शिव मंदिर येथे श्रावण निमित्त जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये मौत का कुआचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा दुचाकीवर स्टंट करत असताना दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हा तरुण दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर सभोवतालच्या भिंतीवर दुचाकी वेगाने धावत राहिली. जखमी तरुणाला गोरखपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.

Viral Video
Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या जत्रेत पंचमुखी शिव मंदिर इथिया येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी प्रशासनाने मंदिर परिसरामध्ये बोली लावून मौत का कुआ बसवण्याची परवानगी दिली होती. परवानगी दिल्यानंतर सुरक्षा मानके न तपासल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Viral Video
लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

तरुण भिंतीवर फिरणाऱ्या दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. अपघातानंतरही दुचाकी सभोवतालच्या भिंतीवर फिरत होती. सुदैवाने तरुणाव्यतिरिक्त इतर कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऑपरेटरकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Viral Video
एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com