ST Bus Leak Video
Saam Tv

लालपरीतून ओलाचिंब प्रवास; बसमध्येच पावसाचं पाणी गळायला लागल्याने चालकावर प्रवाशांने धरली छत्री

ST Bus Leak Video: नांदेड ते अहमदपूर बसमधून प्रवास करताना पावसाचे पाणी थेट बसचालकाच्या अंगावर गळू लागले. चालक भिजू नये म्हणून एका प्रवाशाने त्याच्या डोक्यावर छत्री धरली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Published on

St Viral Video: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नांदेड ते अहमदपूर या मार्गावरील एका एस.टी. बसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्या प्रसंगात पावसाचे पाणी थेट बस चालकाच्या डोक्यावर गळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या गळतीपासून वाचवण्यासाठी एक प्रवासी स्वतः पुढे सरसावत चालकाच्या डोक्यावर छत्री धरतो

या व्हायरल(Viral) व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की बसच्या छतामधून सतत पावसाचे पाणी गळत आहे. इतकंच नव्हे तर ही गळती इतकी गंभीर आहे की, चालकाच्या कपाळावरून थेट स्टीअरिंगवर पाणी वाहू लागले आहे. वाहन चालवताना अशी परिस्थिती चालकासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा पद्धतीने बसमध्ये पाणी गळत राहिल्यास चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढू शकते.

या सर्व प्रकारात विशेष लक्षात राहतो तो प्रवासी. बसमधील एक जागरूक प्रवासी पुढे येऊन बस चालकाच्या डोक्यावर छत्री धरतो आणि त्याला गळणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचं चित्रण देखील त्याच बसमधील दुसऱ्या प्रवाशाने मोबाईलमध्ये केलं असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

या घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल(Social Media) मीडियावरून एस.टी. महामंडळावर टीकेची झोड उठवली आहे. "आम्ही तिकीटाचे पैसे देतो, फक्त जागा मिळावी एवढीच अपेक्षा नाही, तर सुरक्षित व आरोग्यदायी प्रवासही आमचा हक्क आहे," अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

ST Bus Leak Video
Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; नक्की काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com