Beed politics Saam Tv
व्हायरल न्यूज

Maharashtra Politics: बीडमधून मुंडे ब्रँड संपणार? भावाचा राजीनामा, बहीण मैदानात, मुंडेंच्या ब्रँडला बीडमध्ये घरघर?

Beed politics: 1980 पासून बीडवर मुंडे घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय.... मात्र आता बीडच्या मुंडे ब्रँडलाच घरघर लागल्याचं चित्र आहे... त्याला कारण ठरलंय.. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी दिलेला राजीनामा... मात्र बीडवर मुंडे घराण्याचं कसं वर्चस्व राहिलंय? पाहूयात.

Bharat Mohalkar

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 8 आमदार मुंडे घराण्यातील

1980 पासून गोपीनाथ मुंडे 4 वेळा आमदार तर 2 वेळा खासदार

2009 आणि 2014

सलग 2 वेळा पंकजा मुंडे परळीतून विजयी

2012

धनंजय मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी

2014 आणि 2019

गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर प्रीतम मुंडे खासदार

2014 ते 2024

आधी पंकजा मुंडे आणि नंतर धनंजय मुंडेंच्या रुपाने मंत्रिपद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं. आणि त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. तर देशमुखांची हत्या करतानाचे मारेकऱ्यांच्या उन्मादाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मात्र धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती? अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

2014 आणि 2019 मध्ये एकमेकांवर टोकाची टीका करत निवडणूक लढणारे मुंडे बंधू भगिनी लोकसभा निवडणुकीपासून एकत्र आलेत. त्यातच ओबीसी आरक्षणाच्या लढाईत मुंडे बंधू भगिनी एकत्र लढले. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर धाव घेतली. संकटात आलेला मुंडे ब्रँड वाचवण्यासाठी चर्चा केल्याची माहिती समोर आलीय. मात्र मुंडे ब्रँड कसा संकटात आलाय? पाहूयात.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव

पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्रिपद देऊन ताकद कमी केली

मुंडे बंधू-भगिनींना डावलून पालकमंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं

पंकजा मुंडेंना बीडचं नाही तर जालना जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं

मुंडेंकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद अजित पवारांकडेच

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे बॅकफूटवर

धनंजय मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडेंचा प्रशासनावर नसलेला वचक

बीड जिल्ह्यात मुंडेंनी आपला वरचष्मा कायम ठेवला होता.. मात्र आता बीडमध्येच मुंडेंना आव्हान देण्याचे प्रकार वाढल्याने मुंडे ब्रँड संपणार की नव्याने माधव पॅटर्नची बांधणी करुन मुंडे ब्रँड उसळी घेणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT