Mumbai Local Two Passenger Fighting Viral Video Twitter
व्हायरल न्यूज

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा दे दणादण; कॉलर धरली अन् सटासट कानाखाली वाजवल्या, Video व्हायरल

Viral Video: व्हायरल व्हिडीओत, दोघेही एकमेकांना दे दणादण मारताना दिसत आहे.

Chetan Bodke

Mumbai Local Two Passenger Fighting Viral Video

मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटकच बनून राहिली आहे. ही मुंबई लोकल एकाच वेळी लाखो प्रवाशांना एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्याचे काम करते. लोकलचा प्रवास म्हटला की, मैत्री, थोडी गंमत जंमत, शेअरिंग विथ केअरिंग झालंच. पण मुंबई लोकल म्हटलं की, आपल्या नजरेसमोर भांडण राडा हा मुद्दा झटकन येतो.

दिवसेंदिवस लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. या गर्दीमुळे लोकल ट्रेनमध्ये जागा आणि धक्का लागण्यावरून प्रवाशांमध्ये भांडणे आणि हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत, दोघेही एकमेकांना दे दणादण मारताना दिसत आहे.

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन प्रवासी एकमेकांच्या कानाखाली देत मारामारी करताना आपल्याला दिसून येत आहे. कानाखाली मारुन, लाथाबुक्क्यांनी मारत हे दोघेही अगदी जोरात भांडणं करीत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती नाही. सध्या या पुरुषांच्या सेकंड क्लास डब्ब्यातील ही मारामारी प्रचंड चर्चेत आली आहे. हा मारामारीचा व्हिडीओ सध्या ट्वीटरवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ‘मुंबई मॅटर्स’ एक्स (ट्वीटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

जास्त गर्दी नसताना देखील या दोघांमध्ये भांडण होतं. या दोघांच्याही भांडणामध्ये आजुबाजुच्या प्रवाश्यांनीही मध्यस्थी केली नाही. सध्या लोकलमधील दोन पुरुषांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लेडिज डब्ब्यातील दोन महिलांचा मारामारी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये दोघींनीही एकमेकींचे केस ओढून हाणामारी करताना दिसल्या होत्या. त्यांच्या मारामारीचाही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

या व्हिडिओला आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक जणांनी पाहिला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या खूपच पसंदीस पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT