CSMT New Year celebration google
व्हायरल न्यूज

Mumbai Local: नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत, १२ वाजता लोकलच्या हॉर्नने CSMT स्थानकात आवाज घुमला, मुंबईकरांचा जल्लोष अन् डान्स, व्हिडिओ व्हायरल

Mumbai New Year video: नववर्ष 2026 चे स्वागत CSMT स्थानकावर लोकलच्या हॉर्नने करण्यात आले, प्रवाशांचा जल्लोष, नृत्य आणि एकजुटीचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुंबईकरांसाठी हा अविस्मरणीय उत्सवाचा आनंददायी अनुभव ठरला, असे अनेकांनी सांगितले.

Sakshi Sunil Jadhav

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेने नवीन वर्षाचे म्हणजेच 2026 चे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. नववर्षाच्या मध्यरात्री बरोबर 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर लोकल ट्रेनच्या एकत्रित हॉर्नच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रंचड व्हायरल होत आहे. या स्थानकावर नवीन वर्ष नेमकं कशा पद्धतीने साजरं केलं जाणून घेऊयात.

तर... रात्री आणि 2026 सुरु होण्याच्या 1 मिनिटा आधी संपूर्ण प्रवासी ट्रेनच्या बाहेर मोबाइलची टॉर्च लावून उभे राहीले. शेवटचा १ मिनिट असताना सगळ्यांनी एका सुरात काउंटडाऊन करायला सुरुवात केली. काही क्षणांतच घड्याळाने 12.00 चा आकडा दाखवला आणि एकाच वेळी सगळ्या रेल्वेच्या हॉर्नचा नाद ऐकू आला. अशा पद्धतीने स्थानकावर 2026 चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

रोज धकाधकीचा प्रवास करणारे प्रवासी या दिवशी एकत्र येऊन हा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा करत होते. व्हिडीओत हॉर्नच्या आवाजावर काहीजण नाचताना सुद्धा पाहायला मिळाले. या क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.

व्हिडीओमध्ये प्रवासी टाळ्या वाजवत, आनंदाने ओरडत आणि मोबाईलमध्ये हा अविस्मरणीय क्षण टिपताना दिसले. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या CSMT स्थानकावर प्रवासी आणि लोकल ट्रेन यांच्यातील हा अनोखा संवाद पाहून अनेकांनी ही परंपरा कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मध्य रेल्वेकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही नववर्ष स्वागताची विशेष परंपरा जपली जात आहे. शहराच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर थांबून आनंद साजरा करण्याची संधी देणारा हा उपक्रम प्रवाशांमध्ये उत्साह निर्माण करतो. लोकल ट्रेनचा एकत्रित हॉर्न हा मुंबईकरांसाठी फक्त आवाज नसून नव्या वर्षाच्या आशा, उत्साह आणि एकजुटीचे प्रतीक ठरला. 2026 च्या स्वागतासाठी लोकलने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, जमावाकडून आधी धारदार शस्त्राने वार; नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

Municipal Election : २४ वर्षांत पहिल्यांदा घडलं! भिवंडीत उमेदवार बिनविरोध, भाजपनं खातं उघडताच मुख्यमंत्र्यांचा फोन खणखणला

निष्ठावंतांनी भाजप नेत्याला दिलं गाजर भेट,जोरदार घोषणाबाजी अन् पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

Maharashtra Politics: ऐननिवडणुकीत राज ठाकरेंना शिवसेनेचा 'दे धक्का', अंधेरीत मनसेला भलं मोठं खिंडार

Eyebrow Shape: चेहऱ्याचा आकारानुसार परफेक्ट आयब्रो शेप कसा द्यायचा?

SCROLL FOR NEXT