Blood Pressure: कोणत्या वेळी BP अचानक वाढतो? डॉक्टरांनीच दिली माहिती, वेळीच व्हा सावध

Hypertension Awareness: रक्तदाब दिवसभर बदलत राहतो. विशेषतः सकाळी 6 ते 9 या वेळेत BP जास्त वाढतो. डॉक्टरांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार वेळेवर काळजी घेणं आवश्यक आहे.
sudden bp increase
blood pressure timinggoogle
Published On

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणं फार कठीण असतं. अनेकजण यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप असे अनेक प्रयत्न करतात. पण तरीही त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत नाही. अशा वेळीच डॉक्टरांनी दिलेले महत्वाचे सल्ले कामी येतात. त्यानुसार तुम्ही तुमच्या सवयींमध्ये आणि उपचारांमध्ये बदल करू शकता.

तज्ज्ञ म्हणतात, रक्तदाब हा कधीच स्थिर राहत नाही. याचं प्रमाण कमी जास्त होत असतं. याला सर्केडियन रिदम म्हणतात. पण अनेकांच्या मनात असणारी शंका म्हणजे रक्तदाब कोणत्या वेळेस वाढतो. पुढे आपण याबद्दल जाणून घेऊयात.

रक्तदाब हा तुमच्या हालचालींवर अवलंबून असतो. जेव्हा तुमचं शरीर सकाळी जागं होतं तेव्हा रक्तदाब वाढतो. दिवसभर याचं प्रमाण स्थिर असतं. मग दिवसाच्या शेवटी झोपताना याचं प्रमाण कमी होतं. हायपरटेन्शन, डायबेटीज, निद्रानाश किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी ही लय समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या मते सकाळी सहा ते नऊ या वेळेत रक्तदाब जास्त असतो. झोपेतून जागं होण्याच्या या टप्प्यावर शरीर दिवसाच्या कामासाठी स्वतःला तयार करत असतं. त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याच कारणामुळे सकाळच्या वेळेत रक्तदाब वाढतो. सकाळी होणाऱ्या या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

sudden bp increase
Stress Relief Techniques: ताणतणावाला करा Bye Bye! रोज करा ही 5 कामं, टेन्शन फ्री जगाल

दुपारच्या वेळेस रक्तदाब नॉर्मल असतो. या वेळेत आपण काम करतो, चालतो, विचार करतो अशा नियमित हालचालींमुळे शरीर नॉर्मल स्थितीत राहतं. पण कामाचा ताण, मानसिक तणाव, पाणी कमी पिणं, जास्त कॅफिन, वेळेवर जेवण न करणं किंवा सतत बसून काम करणं यामुळे या वेळेतही रक्तदाब वाढू शकतो.

तर संध्याकाळी शरीराला हळूहळू विश्रांतीची गरज असते. मग रक्तदाबही थोडासा कमी होतो. तरीही जड जेवण, मद्यपान, भावनिक ताण किंवा खूप व्यायाम केल्याने संध्याकाळीही रक्तदाब अचानक वाढू शकतो. रात्री झोपेच्या वेळेस साधारण दहा ते वीस टक्क्यांनी रक्तदाब कमी होतो, यालाच नाईट डिपिंग असं म्हटलं जातं. हा टप्पा हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी महत्वाचा असतो. अशा प्रकारे रक्तदाबात बदल होत असतात.

sudden bp increase
Kidney: थंडीत केलेली १ चूक ठरते किडनी निकामी होण्याचं कारण, डॉक्टारांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com