Blood Pressure कायमचा कंट्रोल होणार, फक्त फॉलो करा या ३ सवयी, पन्नाशीतही राहाल फीट अन् फाईन

Blood Pressure: रक्तदाब नियंत्रणासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, प्राणायाम आणि आयुर्वेदिक जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. या सोप्या सवयींनी हृदय, किडनी आणि संपूर्ण आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
नियमित BP तपासणी, मीठ कमी आणि दररोज व्यायाम अत्यंत आवश्यक
Blood Pressure ControlGOOGLE
Published On

सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक लोक स्वत: हून वाईट सवयी लावतात. अगदी सकाळी उठायला आळस करण्यापासून ते रात्री उशीरा झोपण्यापर्यंत लोक वाईट सवयींना फॉलो करतात. याचाच परिणाम तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागावर होत असतो. तज्ज्ञांच्या मते, ब्लड प्रेशरचा आकडा हा साधारण 120/80 mmHg ऐवढा योग्य असतो. पण चुकीच्या सवयींमुळे याचा आकडा वाढतो. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीसंबंधी आजारांचा धोकाही वाढतो. याची लक्षण खूप साधी नाही दुर्लक्षित करण्यासारखी असतात. पुढे आपण लक्षण आणि त्यावर सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

सगळ्यात आधी ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी रोजच्या रोज आकड्यांची तपासणी करा. याने तुमचं ब्लड प्रेशर कळतं आणि कोणत्या कारणांमुळे वाढतं याचाही अंदाज वाढतो. तसेच जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेता तेव्हा काहीही न खाता त्या घ्याव्यात. याने रिकाम्या पोटी तुम्हाला ब्लड प्रेशरचा आकडा व्यवस्थित कळतो. तसेच २ वेळा याची तपासणी केली पाहिजे. एकदा उठल्यावर आणि दुसऱ्यांदा शांत ३० मिनिटे बसल्यानंतर. याने तुमचं टेन्शन हलकं होतं.

नियमित BP तपासणी, मीठ कमी आणि दररोज व्यायाम अत्यंत आवश्यक
New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

सध्या थंडीमध्ये शरीराची हालचाल खूप कमी होते. याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. त्यामुळे आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करावं. फक्त औषधांवर अवलंबून न राहता रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा, बाहेरचे पदार्थ खाणं जमेल तितकं टाळा, जास्त स्ट्रेस घेऊ नका, आनंदी रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा. यासोबतच साधा, सात्त्विक आणि नैसर्गिक आहार घेण्यावर भर द्या. उकडलेली फळं, ताज्या भाज्या आणि हलका, पोषणयुक्त आहार शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

तसेच रुग्ण जतके सकारात्मक राहता तितकं तुमचं आयुष्य सुधारतं. हा विचार करून औषध घ्या. तसेच रोजच्या रोज प्राणायम करा. हा सगळ्यात प्रभावी मार्ग मानला जातो. गरमगरम पाण्याने अंघोळ करा. अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि उद्गीथ यांसारखे प्राणायाम तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

नियमित BP तपासणी, मीठ कमी आणि दररोज व्यायाम अत्यंत आवश्यक
High Cholesterol: जेवण गिळताना त्रास होतोय? कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं तर नाही ना? जाणून घ्या लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com