Mumbai Local Train Viral Video
Mumbai Local Train Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video : एका महिन्याच्या पगारासाठी जीवाशी खेळ; मुंबई लोकलचा आणखी एक धडकी भरवणारा व्हिडिओ

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलच्या अपघातामुळे प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यानंतर मुंबई लोकलचा आणखी एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबईकरांची लाईफलाइन म्हणजेच मुंबई लोकल भीषण अपघातामुळे चर्चेत आली आहे. मध्य रेल्वेवरील दिवा आणि मुंब्रादरम्यानचा अपघात रेल्वे प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला आहे. दोन लोकलमधील प्रवाशांची एकमेकंना धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात ४ जणांनी जीव गमावला. भीषण अपघातानंतर मुंबई लोकलचा आणखी एक धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

मध्य रेल्वेवरून कसारा रेल्वे स्टेशनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातात लोकलमधील ४ निष्पाप प्रवाशांनी जीव गमावला आहे. लोकलच्या प्रचंड गर्दीत प्रवाशांना अक्षरश: फुटबोर्डावर उभे राहून प्रवास करावा लागतो. प्रवाशांना एका महिन्याच्या पगारासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. याच मुंबई लोकलचा आणखी धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नेमका कसा घडला अपघात?

एक लोकल कर्जतच्या दिशेने निघाली होती. तर दुसरी लोकल कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या दिशेने निघाली होती. दोन्ही लोकल दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जवळून गेल्या. त्यावेळी दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धडकले.

दोन्ही लोकलमधील प्रवासी एकमेकांना धडकल्याने जवळपास १० ते १२ प्रवासी ट्रॅकवर पडले. यातील ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबई लोकलमधील गर्दीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाढत्या गर्दीमुळे लोकलला स्वयंचलित दरवाजे लावणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईकरांचा जीवाशी खेळ

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन आता लाईफलाइनच झाली आहे. मुंबईचा लोकल प्रवास मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा आहे. मात्र, याच लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना फुटबोर्डावरच बसून प्रवास करावा लागतो. असाच एक लोकल गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रवासी मुंबई लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहून प्रवास करत आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

अनेक प्रवासी लोकल ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'एका महिन्याच्या पगारासाठी माणसाला रोज जिवाशी खेळावं लागतं, असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?