Monkey Entered In City Car shopping mal Saam TV
व्हायरल न्यूज

VIRAL VIDEO: झाशीमधील मॉलमध्ये भयानक प्रकार; 'माकडा'ने मुलीला हटकलं, पाठलाग करत सर्वांसमोर रडवलं!

Monkey Entered In City Car shopping mall: झाशीतील सिटी कार शॉपिंग मॉलमध्ये एका माकडाने एका मुलीला त्रास दिला. तिचा पाठलाग करत तिला रडकुंडीला आणलं.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका मॉलमध्ये माकडाने थैमान घातला. मॉलमधील ग्राहकांना त्रास देत अनेकांच्या नाकीनऊ आणलं. याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. सिटी कार मॉलमध्ये माकडाने एका महिला ग्राहकावर हल्ला करत तिचा बूट हिसकावून घेतला. भर मॉलमध्ये माकड तिचाच पाठलाग करायचा. माकडाच्या त्रासाला कंटाळून महिला सर्वांसमोर रडकुंडीला आली, याचा व्हिडिओ सोशल मीडिया खूप व्हायरल होत आहे.

सिटी कार मॉलमध्ये घुसलेल्या माकडाने पुरता धुमाकूळ घातला होता. या माकडाने मॉलमधील महिला ग्राहकाच्या डोक्यावर उडी मारत तिच्या डोक्यावर बसून राहिला. डोक्यावर माकड बसल्यामुळे महिला घाबरून थोडा वेळ खाली बसून राहिली. काहींनी माकडाला केळीच लालच दिली. तर काहींनी महिलेला उभे राहण्याचा सल्ला दिला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माकड तिच्या डोक्यावर बाजुला काही होत नव्हता.

भर मॉलमध्ये माकडाने घातलेला धुमाकूळचा व्हिडिओ काढण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ युपी लोकल न्यूज एजन्सी इंडिया व्हाइसने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. "ब्रेकिंगः झाशी मॉलमध्ये माकडाने हाहाकार माजवला, मुलीचा केला प्रचंड छळ, मुलगी आरडाओरडा करताना दिसली, व्हायरल झाला व्हिडिओ" असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

दरम्यान मुलीला त्रास देणाऱ्या माकडाला पळवून लावण्यासाठी मॉलमधील लोकांनी खूप प्रयत्न केले. एक-दोन जणांनी चादर आणत माकडाच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण माकडाने लागलीच कपड्याच्या रॅकवर उडी मारली. दोन तीन रॅकवरून उड्या मारत येत माकडाने पुन्हा महिलेवर हल्ला चढवला. महिलेवर वारंवार हल्ला केला. माकडाने या मुलीचे बूट सुद्धा माकडाने हिसकावून घेतले. त्याचवेळी इतरांनी माकडावर चादर टाकत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी माकड पळून जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT