Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Chandrapur Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्याचे शुल्क हजार रुपयांनी वाढले आहे. प्रवेश, गाईड आणि वाहन शुल्क वाढल्याने पर्यटकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाविरोधात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.
Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?
Chandrapur NewsSaam Tv
Published On
Summary
  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी दर प्रत्येकी १००० रुपयांनी वाढले आहेत.

  • प्रवेश, गाईड आणि वाहन शुल्क एकत्रित वाढवले असून, नवे दर १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

  • या निर्णयावर पर्यटकांनी नाराजी दर्शवली आहे.

  • ताडोबाचे संचालक म्हणाले, " गरजेनुसार वेळोवेळी दरवाढ करण्यात येते आणि याची संकेतस्थळावर नोंद करण्यात आली आहे."

पट्टेदार वाघांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता वाघ बघणे महाग झाले आहे. त्यामुळे आता वाघ कागदावर बघण्याची पाळी ओढवते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात वाघ बघण्यासाठीच्या सफारीचे शुल्क भरमसाठ वाढवण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

या सफारीसाठी आता प्रत्येक पर्यटकाला एकूण एक हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. प्रवेश शुल्कात प्रत्येकी 600 रुपये, गाईड शुल्कात 100 रुपये आणि वाहन शुल्कात 300 रुपये प्रतिपर्यटक अशी वाढ करण्यात आली आहे. हे नवे वाढीव दर येत्या एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या दरवाढीमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?
Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ सहज दिसत असल्याने तो देश विदेशातील वन्यप्रेमी पर्यटकांना नेहमी आकर्षित करतो. पण नव्या वाढीमुळे काय परिणाम होतो, हे एक ऑक्टोबरपासून दिसेलच. मात्र या वाढीच्या विरोधात आता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?
Viral Love Story : प्यार का चक्कर बाबू भैया! महिला बॉस प्रेमात आकंठ बुडाली, कर्मचारी बॉयफ्रेंडसाठी मोजले ३.७३ कोटी!

प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, " ज्या दिवशी ताडोबा सुरू होणार, म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी त्या प्रत्येक प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहेत. हे वाढीव दर पर्यटकांना अजिबात परवडणारे नसून सर्वसामान्य पर्यटक यामुळे वाघ केवळ चित्रात बघतील " असे त्यांचे म्हणणे आहे. ही वाढ मागे घेण्यासाठी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याला किती यश मिळेल, हे नंतर कळेलच,

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?
Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

या दरवाढीने पर्यटकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, याविषयी ताडोबाचे संचालक डॉ प्रभुनाथ शुक्ल यांना विचारले असता त्यांनी गरजेनुसार वेळोवेळी सफारी शुल्क वाढवण्यात येत असून, यापूर्वी देखील वाढ करण्यात आली होती आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावर त्याची रीतसर नोंद देखील करण्यात आली आहे, असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com