
Women Dance Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच प्रकारच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडिओ गमतीदार असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात तर काहींचा डान्स त्यांच्या नकळत सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतो. अशातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तुम्हाला अनेक महिला स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. मात्र त्यातील एका महिलेचा डान्स पाहून तुम्हीही थक्क नक्की होणार.
सोशल मीडियावर यापूर्वीही विशेष महिलांच्या डान्स(Dance)चे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. कधी मुंबई लोकलमध्ये महिला डान्स करताना दिसून येतात तर कधी नवरात्रीच्या दिवसात रेल्वे प्लॅटफॉर्मवरच डान्स करताना दिसून येतात,मात्र सध्या डान्स करत असलेला महिलेचा व्हिडिओ पाहून तुम्ही महिलेच्या उत्साहाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेक महिलावर्ग एका स्टेजवर दिसून येत आहे. काही वेळात संपूर्ण महिला मंडळ डान्स करण्यास सुरुवात करतात. डान्स करताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून प्रत्येक महिला मोठ्या उत्साहात आहे, मात्र त्यातील एक महिला आहे जिचा डान्स अनेकांनी मोबाईलमध्य कैद केलेला आहे,ज्यावरुन तिचा डान्स करण्याचा उत्साह तुम्हाला समजून येईल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या''nandu.mande.1830''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ इतका व्हायरल झाला की नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेट केली आहे,''आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''लय भारी'',तर अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.