Narhari Zirwal Dance Video: झिरवाळ जोमात पब्लिक कोमात; थेट पत्नीला खांद्यावर घेऊन केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

आता देखील त्यांचा लग्नातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSaam TV

Narhari Zirwal: विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ नेहमीत त्यांच्या हटके आणि अनोख्या शैलिमुळे चर्चेत असतात. त्यांच्या राहणीमानामुळे आजवर सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता देखील त्यांचा लग्नातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीसह भन्नाट डान्स केलाय. (Latest Narhari Zirwal Dance Video)

पत्नीला थेट खांद्यावर घेतलं

नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नाच्या वरातीत डिजेच्या तालावर मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली आहेत. ही गाणी ऐकून झिरवाळ यांना देखील नाचण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला थेट खांद्यावर घेतले. खांद्यावर घेत त्यांनी वाजणाऱ्या गाण्यावर तुफान डान्स केला आहे.

Narhari Zirwal
अपात्रतेची मुद्यावर काय म्हणाले Narhari Zirval?

नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे.

सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात 19 जून 1959 साली नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय आहे. आजही घरी शेतीची कामे पत्नी चंद्रभागा व दोन मुले करतात. झिरवाळ देखील समाजकामातून वेळ मिळाला तर शेतीची कामे बघतात.

Narhari Zirwal
Jitendra Awhad Tweet On Rs 2000 note : नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाड भडकले; इतिहासाची आठवण करुन देत केंद्र सरकारवर टीकास्त्र

गेल्या महिन्यात झिरवाळ आपल्या पत्नीसह जपान दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सदरा, धोतर तसेच डोक्यावर गांधी टोपी परिधान केली होती. यावेळी तेथीलही काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com