Viral Video: ओ माय! चकचकीत भांडी, गोल-गोल चपात्या गृहणीपेक्षा शानदार काम करते 'राणी'

Monkey Making Chapati: सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक माकडीण चपात्या आणि भांडी घासतेय. एखाद्या गृहणीसारखं काम करत असल्याने नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जातंय.
 Monkey Making Chapati Making Video
Monkey Making ChapatiSaam Tv
Published On

घराची शोभा वाढवण्यासाठी अनेकजण प्राणी पाळत असतात. तर काहीजण एखाद्या प्राण्याचा आपल्या बाळाप्रमाणे संभाळ करतात. तेव्हा पाळीव प्राणीही त्यांना त्याच पद्धतीचा लळा लावत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक माकडीन आपल्या मालकीणबाईला त्याच्या कामात मदत करतेय. चपाती करण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतची कामे ही माकडीण करते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओ प्रतिक्रिया देत आहेत.

सुंदर, सभ्य माकडीण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माकडीन घरातील कामे करताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या रायबरेलीच्या घरातील आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी माकडीनचे नाव राणी आहे. राणी घरातील कामे करण्यास निपुण आहे. घरातील सर्व काम ही राणी करते. राणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

राणी मालकीणबाईला चपाती बनवण्यासाठी मदत करत आहे. विशेष म्हणजे एखाद्या सुगरन सारखं ती गोल-गोल चपात्या बनवत आहे. मालकीण बाई गॅसवर चपात्या शेकत आहे तर दुसऱ्या बाजुला राणी माकडीन चपात्या लाटत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधलंय. राणीचं काम पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत.

 Monkey Making Chapati Making Video
Viral News: चपाती उशीरा दिल्यामुळे तोडले लग्न; दुसऱ्या मुलीशी बांधली गाठ, वराची गोंधळ घालणारी घटना

घरातील सर्व करणाऱ्या राणीला पाहून नेटकरी कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये ती आपल्याला भांडी घासताना दिसतेय. त्यानंतर स्वयंपाक करतेय, अंथरुण सुद्धा टाकतेय, हे पाहुन अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत. राणीचं कुटुंबीयांवरही प्रेम आहे. घरातील लोकही राणीवर खूप प्रेम करतात. तिची खूप काळजी घेतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून पाहिलाय.

 Monkey Making Chapati Making Video
Viral Video: 'हरे कृष्ण हरे राम...' महिलेने स्त्रोत्र बोलताच मांडीवर बसून माकडाने केले असे काही की... व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

लाखो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय. यावर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला, आता मी माणसांपेक्षा प्राण्यांवर विश्वास ठेवतोय. दुसरा एक युझर म्हणाला, लोकांपेक्षा राणी कितीही योग्य आहे. मेहनत केल्यानंतर काहीच मागत नसेल तर समाधानी आहे. लोकांना मेहनत न करता सर्व काही पाहिजे. तर अजून एकजण म्हणाला या जगात प्राण्यांकडूनही अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com