Viral News: विकृतीचा कळस! रीलसाठी मांजराचा घेतला जीव, पाय बांधून मांजरीला कुत्र्यापुढे टाकलं

Cats Tied & Killed By Dogs For Reels: आरोपी मनदीपच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्राण्यांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक पोस्ट्स होत्या. एका व्हिडिओमध्ये, तो पाळीव कुत्र्याला ओढताना दिसत आहे.
Viral News
cats Tied & Killed By Dogs For Reels
Published On

विकृतीचा कळस गाठणारी घटना पंजाबमधील जालंधर येथे घडलीय. एका नराधम माणसाने रिल्ससाठी एका मांजरीचा जीव घेतलाय. रील बनवण्यासाठी या व्यक्तीने कुत्र्याला मांजरीवर हल्ला करण्यासाठी सोडलं होतं. मांजरीचे पाय बांधून तिला कुत्र्यासमोर ठेवलं होतं. कुत्रा हल्ला करत असताना नराधमाने त्याचा व्हिडिओ बनवलाय. इंटरनेटवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला अटक केलीय.

प्राण्यांच्या अत्याचाराच्या धक्कादायक घटना जालंधर येथे घडली. याप्रकरणी मनदीप नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. प्राण्यांवर वारंवार अत्याचार केल्याबद्दल आणि हिंसक कृत्यांचे त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल मनदीप नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. इंस्टाग्रामवर रील म्हणून पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, मांजरीचे बांधून तिला कुत्र्यापुढे ठेवलं आणि तिच्यावर हल्ला करण्यास सोडल्याचं दिसत आहे.

दरम्यान या नराधम व्यक्तीला पोलिलांनी अटक केलीय. मनदीप नावाच्या व्यक्तीच्या सोशल मीडिया पोस्टही प्राण्यांना त्रास देणाऱ्या आहेत. मनदीपच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्राण्यांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देणाऱ्या असंख्य पोस्ट्स आहेत. एका व्हिडिओमध्ये, एका पाळीव कुत्र्याला ओढताना दिसत आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुत्र्याला अमानुषपणे ओढताना दिसत आहे.

नेटिझन्सने त्याच्या अमानुष कृतीचा निषेध केला आणि प्राण्यांना न्याय द्यावा अशी मागणी करून या पोस्ट्सने ऑनलाइन संताप व्यक्त केलाय. युवी नावाच्या संबंधित व्यक्तीने ॲनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनसह पोलिसांना या घटनेची तक्रार करून निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली होती. ही पोस्ट व्हायल झाल्यानंतर पोलीस लागलीच सतर्क झाले आणि मनदीप विरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला अटक केली.

ऑपरेशन दरम्यान एका कुत्र्याची सुटका करण्यात आली, परंतु मनदीपच्या व्हिडिओमध्ये इतर प्राण्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई पोलीस प्रकरणाचे अपडेट शेअर

मुंबई पोलीस अधिकारी आणि प्राणी कार्यकर्ते सुधीर कुडाळकर यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रकरणाची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या X वर माहिती शेअर कुडाळकर यांनी लिहिले, “मनदीप (पंजाब) विरुद्ध एफआयआर नोंदवला गेला. आरोपीला अटक करण्यात आलीय आणि युवीने एका कुत्र्याची सुटका केलीय. आरोपी: (@mandee5103) हिरो: युवी @ ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनने केवळ योग्य एफआयआर दाखल केला नाही तर कुत्र्यांची सुटकाही केलीय.

आरोपीच्या इंस्टाग्रामवर दाखवलेल्या प्राण्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत."अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मनदीपचा सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यास सांगितलीय. तसेच इंटरनेटवरून त्याने होस्ट केलेल्या अमानुष व्हिडिओ हटवावा असं मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com