money rain at wedding procession saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नात पडला चक्क पैशांचा पाऊस; पाहुण्यांचा उधळलेले पैसा उचलण्यासाठी गोंधळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

money rain at wedding procession: लग्न सोहळ्यात नोटांची उधळण करत पैशांचा पाऊस पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी नोटा उचलण्यासाठी केली मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

Surabhi Jayashree Jagdish

पैशांचा पाऊस पडणं ही संकल्पना आपण आतापर्यंत फक्त ऐकली असेल मात्र एका लग्नात प्रत्यक्षात पैशांचा पाऊस पडलाय! लग्न समारंभात पैशांची उधळण केल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यामध्ये अक्षरशः नोटांचा पाऊस पडत असल्याचं दिसतंय. या बरसणाऱ्या नोटा उचलण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.

एका लग्नसोहळ्यात अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये नोटांची उधळण होताना दिसतेय. इतकंच नाही तर त्या नोटा गोळा करण्यासाठी उपस्थित लोकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. हा प्रकार गुजरातमध्ये घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान वरपक्षाकडून नोटांची उधळण करण्यात आल्याचं दिसतंय. हवेत उडणाऱ्या नोटा पकडण्यासाठी लोक धावत सुटलेत.

युजर्सच्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसतात आहेत. काही जणांनी हा प्रकार 'श्रीमंतीचं प्रदर्शन' असल्याचं म्हटलंय. तर काहींनी हे लक्ष्मीचा अपमान असल्याचं म्हटलंय. 'आनंद साजरा करण्याची ही पद्धत चुकीचंही अनेकांचं म्हणणं आहे. आहे. 'असा पैशांचा वर्षाव फक्त सिनेमात पाहिला होता, अशा कमेंट्सही करण्यात आल्यात.

या व्हायरल व्हिडीओची अधिकृत पुष्टी, नेमकं ठिकाण याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meghna Erande : आता 'सनई चौघडे' वाजणार; मेघना एरंडे घेऊन आली नवीन मालिका, महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार 'हे' प्रसिद्ध कलाकार | VIDEO

BMC Jobs: मुंबई महापालिकेत ५७ हजार रिक्त पदे; भरतीप्रक्रिया लवकरच होणार

Maharashtra Live News Update: कागद जळाले नाही, ब्लॅकबॉक्स कसा जळाला? अजित पवारांच्या अपघातावरुन रोहित पवारांचे सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Real Name: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय ?

Ajit Pawar Death : २१० कोटींच्या इन्शुरन्ससाठी अजित दादांचं विमान पाडलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT