Maratha Aarakshan Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Maratha Aarakshan Viral Video: 'रडू नको बाळा, मी मुंबईला जाते... अन् आरक्षण घेऊन येते'; मराठा आंदोलकांनी गायली गवळण

Radu Nako Bala Viral Song: मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाले.

Manasvi Choudhary

आज मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलनासाठी मुंबईत असंख्य लोक आले आहेत. शहारापासून ते गावखेड्यातून आंदोलनाला लोक उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि हातात झेंडे घेऊन लोक मुंबईच्या रस्त्यावर उतरले आहेत.

सोशल मीडियावर सध्या मराठा आंदोलनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मराठी आरक्षणात सहभागी झालेले आंदोलनकर्ते गवळण गाताना दिसत आहे. मुंबईच्या प्रवासात त्यांनी 'रडू नको बाळा मुंबईला जाते, आरक्षण घेऊन येते' असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सध्या सोशल मीडियावर रडू नको बाळा मी पाण्याला जाते ही गवळण चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक रिल्सस्टार, सोशल मिडिया युजर यावर मजेशीर रिल्स बनवून शेअर करत आहेत. त्यातच आता मराठा आंदोलन सुरू आहे. आणि मराठा आंदोलनामध्ये व्हायरल झालेलं हे गाणं चर्चेत आलं आहे. ट्रकमधून मुंबईला प्रवास करताना ही गवळण गायली आहे. चार व्यक्ती मिळून अत्यंत तालासुरात गवळण गात आहेत. या गवळणीच्या तालासुरात ढोलकी, टाळ सुद्धा वाजवताना दिसत आहे.

सोशल मीडियावर @yashoda.jadhav.731 या इन्स्टाग्राम पेजवरून ही व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. या व्हिडीओला नाद करताय का मराठ्यांचा असं कॅप्शन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

Study Tips: झोपण्यापूर्वी की सकाळी उठल्यानंतर? कोणत्या वेळेत अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते?

SCROLL FOR NEXT