Viral Stunt Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Stunt Video: अवघड घाटात तरुणांची मस्ती; चालू कारवर जीवघेणा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Stunt Video: रस्त्यावर वाहनांची गर्दी अन् या तरुणांच्या अशी स्टंटबाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Dangerous Stunts Video:

बाईक, कार चालवताना भलती स्टंटबाजी करण्याची काही लोकांना फार हौस असते. अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठीही तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. पण असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुणाची स्टंटबाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मनाली ते अटल बोगद्याकडे (Manali Atal Tunnel) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने येत आहेत. अशा वाहनांच्या गर्दीतही काही तरुण मस्ती करताना पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कार चालक दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवताना दिसत आहे. तर त्याच्या शेजारी दुसरा तरुण दरवाजातून बाहेर डोकावत आहे. वाहनांची गर्दी अन् या तरुणांच्या अशा स्टंटबाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घाटामध्ये वाहनांची मोठी कोंडी झाले आहे. अशा परिस्थितीत ते दोन्ही तरुण गाडीचे दरवाजे उघडे ठेऊन स्टंटबाजी ( Stunt Video) करत आहेत. सुदैवाने गाडीचे दरवाजे दुसऱ्या वाहनांना न धडकल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही, मात्र अशा प्रकारे स्टंट करणे अत्यंत धोक्याचे आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी अशा हुल्लबाजांमुळेच अपघात होतात, असे म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT