सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवले जातात. अनेकदा सोशल मीडियावर जागरुकता पसरवणारेही व्हिडिओ असतात. असाच एक जागरुकता पसरवणारा एका पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस नेहमी आपले कर्तव्य बजावतात. नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते नेहमी नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम करतात. अशीच जागरुकता एका पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे. त्यांनी वाहतूकीचे नियम समजावत एका वृद्ध जोडप्याच्या मनात जागरुकता निर्माण केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत एक वयोवृद्ध जोडपे बाईकवरुन जाताना दिसत आहे. त्यांना एक पोलीस कर्मचारी थांबवतात. त्यांची विचारपूस करतात. एवढे वर्ष एकत्र सुखाचा संसार सुरु असल्याने त्यांचे कौतुक करतात. त्यानंतर त्यांना वाहतूकीचे नियम समजवताना दिसत आहे.
पोलीस कर्मचारी वयोवृद्ध आजीला गुलाबाचे फूल देतात. त्यांच्या संसाराला एवढी वर्ष झाली असूनही एकत्र असल्याने त्यांना फूल देऊन ते कौतुक करतात. यानंतर ते आजोबांना एक हेल्मेट देतात.पोलीस वयोवृद्ध आजोबांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगतात. त्यानंतर त्यांच्या बाईकला लाल रंगाचे रेडियम लावतात. जेणेकरन रात्रीचा प्रवास करणे सुरक्षित होईल. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य अगदी चोखपणे बजावले,असे म्हणायला हरकत नाही.
Ajeet Bharti या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. पोलिस खूप चांगले कार्य करत आहेत. जागरुकता पसरवण्याचा हादेखील एक मार्ग आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
पोलिसांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर पोलिसांचे खूप कौतुक, उत्तम कार्य अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.