Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे बापरे, हे काय? बाइकवर बसले तब्बल 13 तरुण; व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले, असे स्टंट करू नका!

Viral Stunt Video: सोशल मीडियावर कायम अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा काही तरुणांचा धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या देशातील अनेक तरुणांना धावत्या बाईकवर थरारक स्टंट करुन दाखवण्यात खूप आनंद होतो. तरुणच नाही तर अनेक व्यक्ती रस्त्यावर धावत्या बाईकवर किंवा कारवर स्टंट करतात तर कधी अनेक कपल्सही थरारक स्टंट करताना दिसून येतात. सध्या इन्स्टाग्रावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तरुणांची स्टंटबाजी पाहून तुम्हीही तुमच्या डोक्याला हात लावाल. व्हायरल व्हिडिओत असलेल्या बाईकवर एक नाही ,दोन नाही तर तब्बल एका बाईकवर १३ तरुण बसलेले दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक बाईक(Bike) रस्त्यावर येताना दिसत आहे. काही क्षणात दिसते की ती बाईक एक तरुण चालवताना दिसत आहे परंतू तुम्ही नीट पाहिले तर त्या बाईकवर अनेक तरुण एक साथ बसले आहेत. सर्व धक्कादायक प्रकार तेथील एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद करतो आणि तोच व्यक्ती त्या बाईकवर किती तरुण बसलेले आहेत ते दाखवत आहे. त्यानंतर व्हिडिओ काढणारा तो व्यक्ती सांगतो की त्या बाईकवर तब्बल १३ तरुण बसलेले आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओतील स्टंट त्या तरुणांसाठी अतिशय धोकादायक तसेच जीवघेणाही आहे. मात्र व्हिडिओत ते तरुण एका बाईकवर कसे बसले असतील याचा विचार नक्की व्हिडिओ पाहून आलात असेल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जो व्यक्ती कॅमेऱ्यात शूट करताना म्हणतो की,' मी अनेक व्यक्ती बाईक चालवताना तसेच इतर वाहन चालवताना पाहिले आहे, पण मी असा कधीच ड्रायव्हर्स पाहिला नाही.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील(instagram) @mustafa_khan0786000 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर या व्हायरल व्हिडिओला ८ लाखांहून अधिकचे यूजर्सकडून लाईक्स मिळाले आहेत तर हजारोंहून अधिकचे व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ एप्रिल महिन्यातील असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओवर(Video) प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट्स केली आहे की,' गाडी अशी चालवायची की लोक म्हणतील त्यांच्या आत्म्याला शांती भेटो' तर आणखी एका यूजरने म्हटंले आहे की,' अशाने अपघात होतात'.तर काहींनी कमेंट्समध्ये लिहिले आहे की,'यांच्यावर कारवाई झालीचं पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT