Bike Stunt Video : पुष्पाराज गाण्याचं तरुणाला वेड; थेट धावत्या बाईकवर झोपून स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

Bike Stunt On Pushpa Song Video Viral : गाण्यावर एका तरुणाने स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाचा स्टंट पाहून तुमच्या ही काळजात धडकी भरेल. भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवर या तरुणाने स्टंट केला आहे.
Bike Stunt Video
Bike Stunt Video Saam TV

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर आता पुष्पा २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा टिझर आणि काही गाणी रिलिज करण्यात आली आहे. तरुणाईमध्ये या गाण्यांची प्रचंड क्रेझ दिसत आहे. अशातच एका पठ्ठ्याने या गाण्यावर खतरनाक रील व्हिडिओ शूट केला आहे.

Bike Stunt Video
Viral Wedding Card: देवा रे देवा! लग्नात येणाऱ्यांसाठी १५ 'खतरनाक' नियम, वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात; डेंजर पत्रिका पाहाच!

सोशल मीडियावर सध्या 'पुष्पाराज' हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केलेत. अशात या गाण्यावर एका तरुणाने स्टंट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाचा स्टंट पाहून तुमच्या ही काळजात धडकी भरेल. भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवर या तरुणाने स्टंट केला आहे.

धावत्या दुचाकीवर झोपला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण दुचाकीवर सरळ झोपला आहे. बाइकवर झोपून त्याने हँडल न धरता दुचाकी चालवली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तरुण फक्त यावर झोपला नाही तर त्याने आपल्या अंदाजात खाली झोपून डान्सही केला आहे. पाठीवर झोपून त्याने आपल्या दोन्ही पायांवर स्टंटबाजी करून दाखवली आहे. तरुणाच्या या अतरंगी व्हिडिओने तो सोशल मीडियावर चर्चेत आला खरा मात्र नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

@amitvermaofficial01 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. अमित असं तरुणाचं नाव असून तो बाईक राइडर असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे बाइकवरील अनेक स्टंट करतानाचे व्हिडिओ आहेत.

नेटकऱ्यांनी तरुणाच्या या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी त्याचं कौतुक केलंय. तर अनेकांनी या तरुणावर टिकास्त्र डागलं आहे. असं केल्याने तरुण स्वत:सह इतरांचं आयुष्य देखील धोक्यात घालत आहे, अशा व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे, अशा कमेंटही नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.

Bike Stunt Video
Crocodile Video: बापरे बाप! चिखलात लपली भली-मोठी मगर; शेपटीवर पाय पडला अन् पाहा थरारक व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com