मध्यप्रदेशमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. रक्षणासाठी ज्यांच्याकडे सर्व जण जातात त्यात GRP अधिकारी महिलेकडून एका अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या आजीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. कटनी येथील या क्रूर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला GRP ऑफिसरने या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या आजीला एका खोलीत बंद केलं आहे. येथे अन्य पोलीस सुद्धा उपस्थित आहेत. सर्वजण GRP ऑफिसरने दिलेल्या आदेशानुसार सुरुवातील या मुलाला क्रूरपणे मारहाण करतात. त्याच्या दोन्ही पायांवर लाकडी दांडक्याने जोरजोरात मारले जाते. नंतर त्याच्या डोक्यात आणि पाठीवर तसेच पोटावर सुद्धा मारतात.
ही क्रूरता एवढ्यावरच थांबत नाही. महिला GRP ऑफिसर नंतर स्वत:च्या हातात काठी घेते आणि महिलेला मारहाण करण्यास सुरुवात करते. ऑफिसर महिला समोरील महिलेला कुठे लागत आहे आणि कुठे नाही असं काहीही न पाहता मारताना दिसत आहे. मारहाण करताना महिला खाली पडते तरी देखील अधिकारी महिला तिला जोरजोरात लाकडी काठीणे मारहाण करत राहते.
राजकीय वर्तृळात खळबळ
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सर्वांसोमर आला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय विश्वात सुद्धा एकच खळबळ उडाली. काँग्रेसने या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ ट्वीट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
नेमकं काय घडलं?
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला GRP ऑफिसरला त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणी अशी माहिती समोर आली आहे की, हा व्हिडिओ ऑक्टोबर २०२३ चा आहे. पीडित मुलगा आणि महिला कुख्यात गुंड दीपक वंशकरच्या कुटुंबातील आहेत.
दीपक एका चोरीच्या प्रकरणात फरार असून त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीला १० हजार रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. चौकशी सुरू असताना महिला GRP ऑफिसरने दीपकच्या कुटुंबातील या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले आणि मारहाण सुरू केली. घटना उजेडात आल्यानंतर महिलेला पदावरून हटवण्यात आले असून ही केस रेल्वे पोलीस उपअधीक्षक यांना देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.