महाराष्ट्र असो वा भारतातील कोणताही जिल्ह्या आपल्याला यामधील प्रत्येक शहरात अनेक समस्या दिसून येतात. सर्व समस्येमध्ये एक समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे खराब झालेल्या रस्त्यांची किंवा खराब रस्त्यामध्ये असलेल्या महाकाय खड्ड्यांची. आता पर्यंत कोणताही व्यक्ती मोठ्या-मोठ्या खड्ड्यांपासून वाचला नाही.आपण अनेक असे व्हिडिओ पाहिले आहे,ज्यात अनेक नागरिक खराब रस्त्यासांठी उपोषणास बसलेले आहेत तर काहीजणांनी आंदोलन केलेले आहेत.
सध्या सोशल मीडियावरही या संबंधिक एक व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे.मात्र जरा आधाची विचार केला तर,सोशल मीडिया असो किंवा आपण पाहिलेले अनेक आंदोलन.ज्या खराब रस्त्यांसाठी अनेक हटके पद्धतीने आंदोलन झाले.मग कोणी दिवसभर रस्त्यावर झोपून राहिले तर कोणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावले.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही खराब झालेल्या रस्त्यांच्या आंदोलनाचा आहे.ज्यात चांगला रस्त्या व्हावा आणि खराब झालेल्या रस्त्यासाठी चक्क रस्त्यावर चक्क यमराज आणि चित्रगुप्त अवतरले आहेत.
नेमका काय प्रकार?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ,कर्नाटकातील (karnataka)उडप्पी येथील आहे. जेथिल व्हायरल व्हिडिओत आपण रस्यावर पडलेले खड्डे पाहू शकतो.या खराब रस्त्यासाठी आणि पडलेल्या खड्ड्यासाठी तीन व्यक्ती वेगळ्या पद्धतीने निषेध करत आहेत. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ,साधारण तीन व्यक्ती आहेत,त्यातील एक व्यक्ती यमराज यांची वेषभुषा केली आहे तर एका व्यक्तीने चित्रगुप्त यांची तर एक व्यक्ती भूताच्या वेषात आहे.
पुढे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता यमराज आणि चित्रगुप्त यांच्या एका हातात अंतर मोजण्याची टेप आहे.ज्याच्या साहाय्याने ते खराब रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे माप मोजत आहे.यांचा हा प्रकार तिथे असलेला एक कॅमेरामॅन कॅमेऱ्यात शूट करत आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल(Viral) होत आहे.
कुठे पाहता येईल?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रावरील''@jist.new''या अकाउटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ शेअर होताच १५ हजारांच्या पुढे लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यात प्रत्येकाने गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते तुम्ही कमेंटबॉक्समध्ये जाणून पाहू शकता.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.