लहानपणापासून आपल्यापैकी प्रत्येकजण आतापर्यंत अनेक एक्शन मुव्ही पाहत आले आहेत. लहानपणी एक्शन मुव्हीमधील स्टंट करताना पाहून आपल्याला कुतूहल वाटत असते.आपल्या आवडचे कलाकार एक्सन स्टंट कसे करत असतील आपण अनेकदा विचार करत असायचो.मात्र चित्रपट चित्रिकरणामध्ये थरारक स्टंट करताना योग्य ती खबरदारी घेतलेली असते.
मात्र अनेकजण कोणताही विचार न करता चित्रपटात दाखविले जाणारे स्टंट(Stunt) करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वता:चा जीव गमावून बसतात.सोशल मीडियावर अनेक असे स्टंटचे व्हिडिओ पाहिले आहेत,जे अक्षरशा:अंगाचा थरकाप उडवणारे असतात.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर आपण याआधी धोकादायक ठिकाणी रील बनवताना तरुण(Young Man) वर्गाचे व्हिडिओ पाहिलेत.या रील व्हिडिओत तरुण असो किंवा तरुणी कोणीही पाठी रहात नाही.मग उंच इमारतीवरुन स्टंट असेल किंवा धावत्या बाईकवरील स्टंट असेल मात्र,सध्या व्हायरल होत असलेली रील व्हिडिओ एका तरुणाचा आहे,जो एका किल्ल्याच्या टोकावरुन स्टंट करत असताना दिसून येत आहे.सध्या या तरुणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ एका किल्ल्यावरील दिसून येत आहेत. मात्र तुम्ही नीट पाहिले तर,किल्लाचा उंचावरील बुरुज दिसून येत आहे.या उंचबुरुजावर एक तरुण एकदम टोकाला उभा आहे. काही वेळात हा तरुण त्या टोकाला उलटा उभा राहून स्टंट करण्यास सुरुवात करतो.
तुम्ही जर व्हिडिओ(Video) पाहिला तर समजेल. या तरुणाचा जराही स्टंट करण्याचा अंदाज चुकला असता तर त्यात त्याचा जीवही गेला असता.मात्र जीवाची पर्वा न करता असा स्टंट तरुण करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्रामवरील @lalluramnews''या अकाउटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. हा स्टंट व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातील आहे हे कळू शकलेले नाही.मात्र व्हिडिओ व्हायरल होताच २९,००० हजारांमध्ये लाईक्स मिळाले असून असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत.
प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गात पाहिला गेला आहे. व्हिडिओला असंख्य यूजरने असंख्य अशा संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''जीव गेला असता तर बरा झाला असता'',तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''हे काही सुधारणारे नाहीत'',तर अनेक यूजरने लिहिले आहे की,'' यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे,''
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.