Local Train Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Local Train Video: लोकल ट्रेनमध्ये तरूणीने गायला शिवरायांचा पोवाडा; नेटकरी म्हणाले, 'संस्कार...'

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना अभिलाषा महाडिक हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर लाखोंनी त्याला पसंती दिली आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर दररोज ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ऑफिस ते घर या प्रवासादरम्यान पोहचेपर्यंत अनेकजण ट्रेनमध्ये भजन, किर्तन करतात. याचदरम्यानचा एका मुलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेकजण विविध कला जोपासतात. अनेकजण इतिहासकालीन पोवाडे, गवळण, संगीत गातात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी रेल्वेमधून प्रवास करताना दिसत आहे. जेव्हा रेल्वेमध्ये ती मुलगी प्रवास करत आहे तेव्हा ती शिवरांयाचा पोवाडा गात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये, तुम्हाला दिसेल की एक मुलगी लोकल ट्रेनमधून प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायला आहे. शिवरायांचा पोवाडा गात ही मुलगी समाजप्रबोधन करताना दिसत आहे. ती सुंदर पोवाडा गाताना दिसत आहे. पोवाडा गाणाऱ्या या मुलीचे नाव कु. अभिलाषा अरविंराव महाडिक आहे. अभिलाषाचा हा व्हिडीओ पाहून खरचं तुमच्याही अंगावर शहारे येतील.

@suhas_bandagale_19 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर लाखो नेटकऱ्यांनी लाईक्स केल्या आहेत. तर एका युजरने, 'जय शिवराय ताई, तर आणखी एकाने, 'मुंबई पुणे सारख्या शहरातील मूल मुली stand-up comedy cold concert सारख्या show मध्ये नाच गाणी करायला जातात तर काही मूल मुली ही अशी स्वतःला आणि संस्कृतीला प्रस्तुत करतात या मधून आपले संस्कार दिसून येतात जय जिजाऊ जय शिवराय ताई' असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT