Bengaluru Girl Letter To PM Narendra Modi: 'खूप ट्रॅफिक आहे, मला शाळेत जायला उशिर होतो', मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र

5 Years Old Girl Letter To PM Narendra Modi: बंगळुरूमधील पाच वर्षांच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रॅफिक आणि रस्त्यांच्या समस्यांवर पत्र लिहले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Viral Video
Bengaluru Girl Letter To PM Narendra ModiSaam Tv
Published On

बेंगळुरूमध्ये शनिवारी मेट्रो येलो लाईनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एका लहान मुलीची पोस्ट नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. एका लहान मुलीने पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती केली आहे.

बंगळुरू येथे राहणारी छोटी मुलगी आर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. खास स्वत:च्या हस्ताक्षरात या मुलीने पत्र लिहले आहे, ज्यामध्ये तिने, 'नरेंद्र मोदीजी, इथे प्रचंड वाहतूक आहे. यामुळे आम्ही शाळेत आणि ऑफिसला उशीरा पोहचतो. रस्ताही खूप खराब आहे. कृपया मदत करा' असं आवाहन पत्रातून केलं आहे.

या लहान मुलीच्या वडिलांनी हे पत्र सोशल मिडिया माध्यम 'एक्स' वर शेअर केले आहे. जे सध्या तुफान व्हायरल झाले आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी "पंतप्रधान बंगळुरूला येत आहेत. माझ्या ५ वर्षांच्या मुलीला वाटते की वाहतूक दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे."

सोशल मीडियावर या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटस केल्या आहेत. एका युजरने, सर्वात कठीण काम म्हणजे मुलांना मूलभूत सुविधा चांगल्या स्थितीत का नाहीत हे समजावून सांगणे. आणखी एकाने, माझ्या मुलीने एकदा मुंबईत रात्री उशिरा होणाऱ्या आवाजाबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते, त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्षात कारवाई केली. तर काहीनी, भाजप आणि काँग्रेस दोन्ही सरकारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com