उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रील बनवताना एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रस्त्याच्या कडेला रील बनवणे एका महिलेला चांगलंच महागात पडलं (Chain Snatching Viral Video) आहे. ही महिला रील बनवत असताना एका दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने तिच्या गळ्यातील साखळी ओढून पळ काढला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (latest viral news)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला रील बनवत असल्याचं दिसून येतंय. ती तिचा रील शुट करताना हळूहळू कॅमेऱ्याच्या दिशेने येत (Snatching Live Video) होती. तेवढ्यात एका दुचाकीस्वार आला. त्याने महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावून पळ काढला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडिओ बघताना तो रीलचा भाग असल्याचं वाटतंय. पण जेव्हा या महिलेनं आरडाओरड केली तेव्हा ती स्नॅचिंगची घटना असल्याचं समोर आलं आहे.या घटनेमुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत (Live Chain Snatching ) आहेत.
हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने थेट महिलेच्या गळ्यातील साखळी खेचली आणि त्याने भरधाव वेगात पळ काढसा. भरदिवसा रस्त्यावर चैन स्नॅचिंगची घटना पाहून (viral) लोक कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. व्हिडिओ सुरू असताना चोराने बिनधास्तपणे त्याचा डाव साधला आहे.
या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण म्हणतात की, लोकं आजकाल रील्स बनवण्यात इतके व्यस्त झाले आहेत की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय, हे देखील कळत (viral news) नाहीये. दुचाकीस्वाराने कॅमेऱ्यासमोर महिलेच्या गळ्यातील साखळी ओढली आहे.
खरं तर भररस्त्यात रील शुट करणं, या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.रील बनवताना अपघात होत असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. परंतु आता रील बनवताना चोरी, लुटमार देखील (viral video) होतेय. याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.